CM Devendra Fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

Municipal Election Result: कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? A टू Z माहिती एकाच क्ल्किकवर...

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील २९ महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महायुतीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. राज्यात भाजपचे १४२५ उमेदवार विजयी झाले. कोणत्या महानगर पालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता आली वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा दबदबा

  • भाजप सर्वात मोठा पक्ष

  • भाजपचे १४२५ नगरसेवक विजयी

  • मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह १६ महापालिकांवर भाजपची सत्ता

राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली. या सर्व महानगर पालिकेवर महायुतीमधील भाजपसह सर्वच मित्र पक्षांना चांगले यश मिळून आले. या सर्व महापालिकांमध्ये भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता मिळवली. महत्वाचे म्हणजे या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. कारण या महापालिकांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह १६ महानगर पालिकांवर भाजपची सत्ता आली आहे. राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक आले ते आपण एका क्लिकवर पाहणार आहोत....

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. भाजप- शिंदेसेनेच्या महायुतीने सर्वात जास्त जागा मिळल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेली मुंबई महानगर पालिका काबिज केली. मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपचे ८९ उमेदवार विजयी झाले तर शिंदेसेनेचे २९ उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीमध्ये महायुतीला शह देण्यासाठी तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. ठाकरे बंधूंनी युती केली आणि त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पाठिंबा दिला. या निवडणुकीत ठाकरेसेना ६५, मनसे ६, शरद पवारांची राष्ट्रवादी १, काँग्रेस २४, अजित पवारांची राष्ट्रवादी ३, एमआयएम ८, इतर २ जागांवर विजयी झाले.

राज्यात कुणाचे किती उमेदवार विजयी -

भाजप - १४२५ उमेदवार

बहुजन समाजवादी पार्टी - ६ उमेदवार

काँग्रेस - ३२४ उमेदवार

राष्ट्रवादी अजित पवार गट - १६७ उमेदवार

शिवसेना शिंदे गट -३९९ उमेदवार

मनसे - १३ उमेदवार

शिवसेना ठाकरे गट - १५५ उमेदवार

राष्ट्रवादी शरद पवार गट - ३६ उमेदवार

कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता?

मुंबई - भाजप-शिंदेसेना

ठाणे - शिंदेसेना- भाजप

नवी मुंबई- भाजप

कल्याण-डोंबिवली - शिंदेसेना- भाजप

उल्हासनगर - शिंदेसेना-स्थानिक आघाडी

भिवंडी-निजामपूर - त्रिशंकू

पनवेल- भाजप

मीरा-भाईंदर - भाजप

वसई-विरार - बविआ

नाशिक - भाजप

मालेगाव - स्थानिक आघाडी

धुळे- भाजप

जळगाव - भाजप

अहिल्यानगर- भाजप- राष्ट्रवादी अजित पवार गट

पुणे - भाजप

पिंपरी-चिंचवड - भाजप

सांगली-मिरज-कुपवाड - भाजप

सोलापूर - भाजप

कोल्हापूर - महायुती

छत्रपती संभाजीनगर - भाजप

परभणी - महाविकास आघाडी

नांदेड- वाघाळा - भाजप

लातूर- काँग्रेस

अमरावती - भाजप-युवा स्वाभिमान

अकोला - भाजप

नागपूर - भाजप

चंद्रपूर - काँग्रेस

जालना - भाजप

इचलकरंजी - भाजप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: नव्या नवरीसाठी खरेदी करा 5 लेटेस्ट मंगळसूत्र, लूक दिसेल उठून

Heart Attack: डॉक्टरांनी सांगितल्या ४ सवयी ज्या वाढवतात हार्ट अटॅकचा धोका; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

Ladki Bahin Yojana : एकत्र ₹३००० का नाहीत? लाडक्या बहि‍णींचा संताप, थेट महामार्ग रोखला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

Navi Mumbai Result: नवी मुंबईत भाजपची एकहाती सत्ता, कोणत्या वॉर्डमधून कोण जिंकले? वाचा विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT