सोलापूरमधील मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे पाटील यांचे नाव
Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: सोलापूरमधील मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे पाटील यांचे नाव

विश्वभुषण लिमये

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मुंगशी (दहिटणे) येथील मुंगशी विद्यालयास मनोज जरांगे पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच एका शाळेला जरंगे यांचं नाव देण्यात येणार आहे. मुंगशी विद्यालय या शाळेचे नाव यापुढे मनोज जरांगे पाटील विद्यालय, मुंगशी (दहिटणे) असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंगशी येथे १९९८ मध्ये जय जगदंबा शिक्षण संस्था सर्जापुरचे संस्थापक शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांनी मुंगशी विद्यालयाची स्थापना केली. सध्या विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालू आहे.

या शाळेत मुंगशी, दहिटणे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे दहावीच्या शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम आहे. यातच मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे पाटील यांचं नाव देण्यास अनुमती मिळावी यासाठी संस्थेकडून त्यांना पत्र ही पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी मनोज जरंगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्याची बातमी समीर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, नाशिकमधील सकल मराठा समाजाची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

Mumbai Rain: ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

SCROLL FOR NEXT