Buldhana BJP संजय जाधव
महाराष्ट्र

पंकजा मुंडेना तिकीट नाकारल्याने मुंडे समर्थक आक्रमक; टरबूज फोडून केला भाजपचा निषेध

'पंकजा मुंडे या बहुजन नेत्या आहेत, त्यामुळेच भाजपा बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ देत नाही, असा आरोपही मुंडे समर्थकांनी केला आहे.'

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून भाजपने आयात उमेदवारांना तिकिटे दिली. मात्र, ज्या स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (BJP) वाढविला त्या मुंडे साहेबांच्या कन्या , माजी मंत्री पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे.

तसंच पंकजा मुंडे यांना डावलल्यामुळे आक्रमक झालेल्या मुंडे समर्थकांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे टरबूज फोडून निषेध केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत. काल,परवा एका मुंडे समर्थकाने भर पत्रकार परिषदेत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पंकजा मुंडे समर्थकांनी आघाडी उघडली आहे.

हे देखील पाहा -

पंकजा मुंडे या बहुजन नेत्या आहेत, त्यामुळेच भाजपा बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ देत नाही, असा आरोपही मुंडे समर्थकांनी केला आहे. तर येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका मधून भाजपाला हद्दपार करून भाजपच्या बहुजन विरोधी धोरणाचा बदला घेणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तर यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टरबुज फोडून घोषणाबाजी करीत भाजपचा जाहीर निषेधही केला.

दरम्यान, काल बीडमधील (Beed) मुंडे समर्थकांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला होता. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे जाणून बुजून मुंडे भगिनींना डावललं जात आहे. जो ५ वर्षाला पक्ष बदलतो, त्याला आमदारकी खासदारकी दिली जाते, ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नाही, नगरसेवक होण्याची लायकी नाही त्याला केंद्रीय मंत्री केल जातं मात्र, मुंडे यांना उमेदवारी दिली जात नाही हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा ? असा प्रश्न बीडमधील भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता.

Edited By - Jagdish patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT