Pankaja Munde Meet Prakash Ambedkar  
महाराष्ट्र

Pankaja Munde Meet Prakash Ambedkar: ओबीसींसाठी पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर एकत्र? वाटेतच घडली आंबेडकर आणि मुंडे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

Pankaja Munde Meet Prakash Ambedkar : भाजप नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

Tanmay Tillu

ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी नेत्या पंकजा मुंडेंची भेट घेतल्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. आंबेडकर नेमके कुठे आणि का भेटले पंकजा मुंडेंना? ओबीसी आरक्षणासाठी काय आहे रणनीती यावरचा हा रिपोर्ट.

ओबीसी आरक्षणासाठी आता प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले आहेत. त्यांनी आरक्षण बजाव रॅली सुरू केलीय. त्यानिमित्तानं ते बीडला जात होते. तर ओबीसी नेत्या आणि नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे या लातूरच्या दिशेनं निघाल्या होत्या. दोघेही वाटेत भेटले. मात्र यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. ही भेट अचानक झाल्याचा दावा दोघांनी केलाय.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेला भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी भेट दिलीय. या भेटीनंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे यांची भेट झाली नाही, त्यांनी भेट घेतली असे म्हणा. भेट आम्हाला कोणीही देऊ शकतो. त्यांचा काय हेतू आहे, हे तुम्ही त्यांना विचारा. चर्चा ही पब्लिकमध्ये होत नसते. आम्ही आंदोलनाचे पत्र त्यांना आणि धनंजय मुंडे यांना दिलेले आहे. छगन भुजबळ यांना देखील दिलेले आहे. जेवढे ओबीसी नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही पत्र दिलेले आहे, त्यांनी ठरवायचे की आम्हाला फक्त भेट द्यायची आहे की सहभागी व्हायचं आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आंबेडकरांनी थेट जरांगेंच्या स्टेजवर जाऊन त्यांना खुला पाठिंबा दिला होता. मात्र आता आंबेडकर आरक्षण बचाव रॅलीच्या माध्यमातून ओबीसींच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत. त्यात आता पंकजा मुंडे यांच्याशी भेटीमुळे नवी राजकीय आणि सामाजिक समीकरणं उदयाला येणार का अशी चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

SCROLL FOR NEXT