Vile Parle Sahara Hotel Nishant Tripathi Suicide Mother FB Post Saam Tv News
महाराष्ट्र

Nishant Tripathi : मला आज जिवंत सांगाड्याप्रमाणे वाटतंय, निशांत त्रिपाठींच्या अंत्यसंस्कारानंतर आईचा मन हेलावणारा टाहो

Ville Parle Sahara Hotel Nishant Tripathi Suicide : निशांत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नी आणि तिच्या मावशीमुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे.

Prashant Patil

मुंबई : गेल्या काही दिवसात पत्नीच्या छळाला कंटाळून पती टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच ४१ वर्षीय निशांत त्रिपाठी यांनी मुंबईतील विले पार्लेमधील सहारा हॉटेलमध्ये आपलं जीवन संपवल्यानंतर त्यांच्या आईने फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

नीलम चतुर्वैदी महिला हक्क कार्यकर्त्या असून त्यांनी आपली सून अपूर्वा पारीख आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. निशांत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नी आणि तिच्या मावशीमुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. त्यांच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईने फेसबुकवर काय लिहिलंय?

मला आज जिवंत सांगाड्याप्रमाणे वाटत आहे, असं त्यांनी मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. तुम्ही मला जिवंत व्यक्ती म्हणून पाहत आहात, पण मी मेले आहे हेच सत्य आहे, असाही आक्रोश त्यांनी मांडला आहे. यावेळी त्यांनी आपण महिलांचे हक्क आणि लैंगित समानतेसाठी लढत असल्याचं सांगितलं आहे.

निशांत त्रिपाठी यांनी फिल्म इंडस्ट्रीत काम केलं असून, शुक्रवारी सहारा हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. आत्महत्येपूर्वी त्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर सुसाईड नोट पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी आपली पत्नी आणि तिच्या मावशीमुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. नीलम यांनी आता आपला मुलगा नसल्याने आयुष्य संपलं आहे अशी व्यथा मांडली आहे.

माझं आयुष्य आता संपलं आहे. माझा मुलगा, निशांत मला सोडून गेला. मी आता जिवंत सांगाडा झाले आहे. त्याने माझ्यावर अंत्यसंस्कार करणं अपेक्षित होतं. पण मी माझ्या मुलावर अंत्यसंस्कार केले. माझी मुलगी प्राचीने तिच्या मोठ्या भावाचे अंत्यविधी केले. इतक्या मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी मला आणि माझ्या मुलीला धैर्य द्या, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT