Mumbai Sahara Hotel Nishant Tripathi Suicide Saam Tv News
महाराष्ट्र

Nishant Tripathi : हाय बेब..., मी प्रेम निवडतो; मुंबईच्या टॉपच्या हॉटेलमध्ये युवकानं आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं?

Mumbai Sahara Hotel Nishant Tripathi Suicide : पोलिसांनी निशांत त्रिपाठी यांची पत्नी अपूर्वा पारीख आणि मावशी प्रार्थना मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prashant Patil

मुंबई : गेल्या आठवड्यात आग्रा येथे मानव शर्मा नावाच्या टिसीएस या आयटी कर्मचाऱ्याने घटस्फोटाच्या क्लेशदायक प्रक्रियेला कंटाळून आत्महत्या केली होती. यानंतर आता मुंबईतूनही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या सहारा हॉटेलमध्ये एका ४१ वर्षीय निशांत त्रिपाठीने आत्महत्या केली आहे. सुसाइड नोटमध्ये त्यांनी पत्नी आणि मावशीला यासाठी जबाबदार धरलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी निशांत त्रिपाठी यांनी हॉटेलच्या दरवाजावर डू नॉट डिस्टर्बचा टॅग लावला होता. त्यानंतर कंपनीच्या साईटवरुन त्यांनी सुसाईड नोट अपलोड केली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी निशांत त्रिपाठी यांची पत्नी अपूर्वा पारीख आणि मावशी प्रार्थना मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. आत्महत्या करण्याच्या तीन दिवस आधी निशांत त्रिपाठी मुंबईच्या सहारा हॉटेलमध्ये थांबले होते. २८ फेब्रुवारी रोजी हॉटेलच्या बाथरुममध्ये त्यांनी गळफास लावून घेतला. त्याआधी त्यांनी दरवाजाला डू नॉट डिस्टर्बचा टॅग लावला होता.

निशांत यांनी बराच वेळ दरवाजा उघडला नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडी चावीने दरवाजा उघडला. आत जाऊन पाहिल्यानंतर निशांत मृतावस्थेत आढळून आले. यानंतर विमानतळ पोलिसांना तात्काळ याची सूचना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. तपासादरम्यान पोलिसांना त्रिपाठी यांनी कंपनीच्या साईटवरुन अपलोड केलेली सुसाईड नोट सापडली.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलेलं?

हाय बेब, तू जेव्हा हे पत्र वाचशील, तोपर्यंत मी या जगात नसेन. तुझ्याबरोबर जे काही झाले, त्याबद्दल मी तुझा द्वेष करू शकतो. पण मला असे करायचे नाही. मी यावेळी प्रेम निवडतो. मी तेव्हाही तुझ्याशी प्रेम करत होतो, करत आहे आणि पुढेही करत राहील. तसेच निशांत त्रिपाठी यांनी पुढे लिहिले, मी ज्या संकटाचा सामना केला, त्याबद्दल माझ्या आईला कल्पना आहे. तू आणि प्रार्थना मावशी माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहात. यासाठी आता तुम्हाला विनंती करतो की, माझ्या आईपासून दूर रहा. ती आधीच खूप दुःखी आहे. तिला शांततेत राहू द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT