Railway, Pune , Mumbai, Nagpur Rail Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rail Update : 'त्या' अपघातानंतर मुंबई, पुणे - नागपूर रेल्वे सेवा सुरळीत सुरु

या अपघातामुळे नागपूर मुंबई , पुणे रेल्वे विस्कळीत झाली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Rail Update : अमरावती (amravati) येथील मालखेड (malkhed) जवळ साेमवारी कोळशाच्या मालगाडीचे एकाेणीस डबे रूळावरून घसरल्याने रेल्वे मार्ग बंद होऊन वाहतूक विस्कळीत हाेती. रेल्वे प्रशासनाने 24 तासांत युध्द पातळीवरील केलेल्या कामामुळे रेल्वेची नियमीत सेवा पुर्ववत झाली आहे. विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस व अन्य मालगाड्या धावल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. (Breaking Marathi News)

मालखेड रेल्वे स्टेशन नजीक मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले हाेते. नागपूरहून भुसावळकडे जाणाऱ्या रुळावरुन मालगाडी निघाली हाेती. (23 ऑक्टोबरच्या मध्यरात्री) मालगाडीचा अपघात झाला. यावेळी रेल्वे प्रशासनासोबत जिल्हा प्रशासन, तहसील प्रशासनाचे तहसीलदार राजेंद्र इंगळे, नायब तहसिलदार केशव मळसने, मंडळ अधिकारी अमोल देशमुख, तलाठी प्रफुल्ल गेडाम पोलीस पाटील एम व्ही माहुरे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर सर्व यंत्रणांनी रेल्वे प्रशासनाला दुरुस्तीच्या कार्यास सहकार्य केले.

रेल्वे प्रशासनाचे शेकडो कर्मचारी व अधिकारी यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने रात्रीच्या सुमारास मुंबई (mumbai) , पुणे - नागपूर (nagpur) रेल्वे महामार्गवरील एक ट्रॅक पुर्ववत सुरु झाला. दरम्यान त्यानंतर रात्रीपासून चार एक्सप्रेस आणि मालगाड्या धावल्याची माहिती प्रशासनाने दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Disease Symptoms: डोळ्यातून पाणी अन् त्वचेत बदल जाणवतोय? असू शकतात किडनी फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT