Anil Parab On North-West Lok Sabha Election Result 
महाराष्ट्र

Anil Parab: उत्तर-पश्चिमचा निकाल संशयास्पद; मतमोजणीत कुठे गडबड झाली, अनिल परबांनी दिली खडांखडा माहिती

Anil Parab On North-West Lok Sabha Election Result: उत्तर- दक्षिण मतदारसंघाच्या निकालाची चर्चा अख्या देशात होत आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे नेते रविंद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. मोबाईलद्वारे ईव्हीएम चालवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

निवडणुकीची एक प्रक्रिया असते, या प्रक्रियेला हरताळ फसण्यात आलंय. मतमोजणीच्या १९ व्या फेरीनंतर निकलातील पारदर्शकता कमी झाली, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलीय. उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या निकालाविरोधात ठाकरे गटात न्यायालयात जाणार असल्याची माहिती नेते अनिल परब यांनी केला. दरम्यान उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळी कोणतीच गडबड झाली नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असला तरी ठाकरे गटाकडून निकालावर संशय व्यक्त केला जातोय.

अमोल कीर्तीकर आणि रविंद्र वायकर यांचा निकाल राज्यासह देशभरात चर्चेत आहे. नेमका विजय कोणाचा? खरं कोण अन् खोटं कोण यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ईव्हीएम मोबाईल किंवा ओटीपीद्वारे चालवता येत नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिल्यानंतरही त्या निकालावर ठाकरे गटाकडून संशय उपस्थित केला जातोय. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत मतमोजणीतील पारदर्शकता नष्ट झाल्याचा आरोप केलाय.

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागला, हा निकाल. त्यात आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. निवडणुकीची एक प्रक्रिया असते, या प्रक्रियेला हरताळ फसण्यात आल्याचं परब म्हणालेत. मतमोजणीच्या १९ व्या फेरीनंतर निकालातील पारदर्शकता कमी झालीये. एक फेरी पूर्ण झाली की आरओ उमेदवाराला मिळालेल्या मतांची माहिती देते. ही माहिती १९ व्या फेरीपर्यंत सगळी माहिती सांगितली जात होती. मात्र त्यानंतर माहिती दिल्या गेली नसल्याचं परब म्हणालेत. मतमोजणीच्यावेळी १४ टेबल असतात.

तिथेच ARO चं टेबल असतं. तिथे मतदानाची आकडेवारी जाते मग त्यानंतर RO कडे मतमोजणीच्या माहिती दिली जाते. यावेळेला ARO चा टेबल आणि आमच्यात खूप अंतर ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे आम्हाला ARO पुढे काय पाठवतो याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. फॉर्म १७ (C) पार्ट २- यामध्ये किती मतदान झालं. आम्ही मोजलेली मतं आणि त्यांनी मोजलेली मतं हे कळतं. हा फॉर्म काहींना दिलाय आणि काहींना दिलेला नाही.

आम्ही केलेली बेरीज आणि त्यांची बेरीज यामध्ये ६५० मतांचा फरक आल्याची माहिती परब यांनी दिलीय. निकाल जाहीर करायच्या आधी अधिकारी उमेदवारांना विचारायचं असतं की कोणाला काही आक्षेप नाही ना, मात्र असं काही विचारलं नसल्याची माहिती अनिल परब यांनी यावेळी दिली.

दरम्यान रविंद्र वायकर यांचे मेव्हुणे मतमोजणीवेळी हे मोबाईल वापरत होते. त्यावेळी तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी कोणताची कारवाई करण्यात आली नव्हती. आता पंडिलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर बोलताना अनिल परब म्हणाला की, मतमोजणीच्यावेळी वापरण्यात आला मोबाईल फोन बदलण्यात आलाय, असा आरोप परब यांनी केलाय.

पत्रकार परिषदेत बोलताना परब म्हणाले की, पंडिलकर यांचा फोन RO अधिकाऱ्याला येत होता. वॉशरूममध्ये जाऊन ते बोलत होते. ते कोणासोबत बोलत होते याची माहिती आम्हाला मिळालीय. तिथे त्यांची सुरू असलेली धडपड आम्ही बघत होतो. हा वायकर यांचे नातेवाईक पंडिलकर फोन वापरत होते. दहा दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा फोन बदलण्यात आल्याचा आरोप परब यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

SCROLL FOR NEXT