Vijay Wadettiwar News: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रकृती बिघडली; अधिवेशनालाही गैरहजर राहणार
Vijay Wadettiwar  Saam Tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar News: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, अधिवेशनालाही गैरहजर राहणार

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १ जुलै २०२४

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील अनेक मुद्द्यांवरुन अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आजच्या कामकाजातही बजेटवरुन घमासान होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रकृती खराब असल्याने ते आजच्या कामकाजास उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे प्रकृती खराब असल्याने आज सभागृहात उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. वडेट्टीवार यांची प्रकृती चांगली नसल्याने (पोटाचा त्रास असल्याने) रविवारी सायंकाळी नागपुरात धंतोली येथील रुग्णलायत त्यांना दाखल करण्यात आले होते.

मागील तीन चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी मुंबईतसुद्धा उपचार घेतले होते. प्रकृती बरी नसल्याने ते सध्या नागपूरात असून मुंबईत जाणे शक्य नसल्याने अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाही अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, विधानसभेत आज मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. घाटकोपर दुर्घटनेवर आज विधानसभेत चर्चेची शक्यता असून मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांकडून घाटकोपर दुर्घटनेवर लक्षवेधी घेण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील म्हाडाच्या अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्नही पेटण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्या महायुतीचा मेळावा

Britain Election: मोठी बातमी! ब्रिटनमध्ये सत्ताबदल; ऋषी सुनक यांचा पराभव, मजूर पक्ष सरकार करणार स्थापन

Pune Hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; अखेर अल्पवयीन तरुणाने सादर केला ३०० शब्दांचा निबंध

Sangli Crime: 'भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे?' किरकोळ वादातून घडलं भयंकर; डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीला संपवलं

Vitthal Mandir Video : विठुरायाच्या गाभाऱ्यात १३० किलो चांदीची मेघडंबरी

SCROLL FOR NEXT