Maharashtra Politics: 'भारतानं वर्ल्डकप जिंकला, आम्ही विधानसभा जिंकणार', राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास

Maharashtra Politics Breaking News: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले. तसेच यावेळी त्यांनी भारताने वर्ल्डकप जिंकला, आता आम्ही विधानसभा जिंकणार असा विश्वासही व्यक्त केला.
Maharashtra Politics: 'भारतानं वर्ल्डकप जिंकला,  आम्ही विधानसभा जिंकणार', राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
Radhakrishna Vikhe Patil Saam Tv

जळगाव, ता. ३० जून २०२४

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत टी- ट्वेंटी विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. तब्बल १७ वर्षानंतर भारतीय संघाने विश्वचषकाची ट्रॉफी उंचावल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले. तसेच यावेळी त्यांनी भारताने वर्ल्डकप जिंकला, आता आम्ही विधानसभा जिंकणार असा विश्वासही व्यक्त केला.

Maharashtra Politics: 'भारतानं वर्ल्डकप जिंकला,  आम्ही विधानसभा जिंकणार', राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
T20 World Cup Final: हार्दिक, विराट आणि रोहितसाठी अग्निपरीक्षापेक्षा कमी नव्हता अंतिम सामना; खेळाने दिलं टीकाकारांना उत्तर

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

"सर्व भारतवाशांसाठी कालचा दिवस मोठा आनंदाचा क्षण होता. संपूर्ण भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीने भारताने वर्ल्डकप जिंकलेला आहे, त्याच पद्धतीने विधानसभा निवडणूकसुद्धा आमची महायुती तेवढ्याच ताकतीने जिंकणार आहे, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तसेच "राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर झालेल्या अर्थसंकल्पावरुही त्यांनी महत्वाचे विधान केले. राज्याच्या विकासाचे नवीन पहाट झालेली आहे. सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेमध्ये सामावून घेणारा हा अर्थसंकल्प आहे," असे ते म्हणाले.

Maharashtra Politics: 'भारतानं वर्ल्डकप जिंकला,  आम्ही विधानसभा जिंकणार', राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
Maharashtra Politics : अजित पवारांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसणार? तब्बल १४ नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट, पाहा VIDEO

यापूर्वी "दोन वेळा फायनलमध्ये जावू आपण जिंकलो नव्हतो. मात्र त्यावेळी झालेल्या पराभवावर भारताने काल वर्ल्डकप जिंकून फुंकर घातलेली आहे. विधानसभेचे मॅच ही आमची महायुती जिंकेल आणि त्याकरिता आम्ही आत्तापासून अग्रेसर झालेला आहोत," असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले.

Maharashtra Politics: 'भारतानं वर्ल्डकप जिंकला,  आम्ही विधानसभा जिंकणार', राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
Cyber Crime : शेतकऱ्याची ९५ लाखांत फसवणूक; शेअर मार्केटमध्ये ज्यादा पैसे कमविण्याचे आमिष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com