Jogeshwari Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Jogeshwari Vidhan Sabha : गुरु कधी कमजोर नसतो, सव्वाशेर असतो; रवींद्र वायकरांची बाळा नर यांच्यावर टीका

Mumbai News : शिवसेना शिंदे गटाकडून काल शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार बाळा नर यांच्या थोरल्या सुनेचा एक व्हिडिओ जोगेश्वरीत व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केला असा संशय शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांना झाला

Rajesh Sonwane

संजय गडदे

मुंबई : गुरु कधी कमजोर नसतो, शेराला सव्वाशेर असतो आणि तो तुझा बाप आहे; हे लक्षात ठेवावे ;असे म्हणत खासदार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

शिवसेना शिंदे गटाकडून काल शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार बाळा नर यांच्या थोरल्या सुनेचा एक व्हिडिओ जोगेश्वरीत व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केला असा संशय शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांना झाला. यानंतर नर यांनी देखील वायकर यांच्यावर टीका करताना म्हटले वायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी देखील त्यांचा अनेक खाजगी गोष्टी बाहेर काढू शकतो असे म्हटले यावर आज वायकर यांनी देखील प्रत्युत्तर देत नर यांच्यावर टीका केली.

जोगेश्वरीतील पूनमनगर परिसरात सभेत बोलताना वायकर म्हणाले, कालपर्यंत मला गुरु मानणाऱ्या एकाने असं म्हटले आहे, की त्यांना ५२ विद्या येत असतील, तर मला ५३ विद्या माहिती आहे. असे पण ५२ विद्या कोणत्या हे मला माहित नाही. मी कधी ऐकले नाही. एवढं माहिती आहे त्या गणरायाला १४ विद्यांचा गणपती बोलतात. गणपतीला चौदा विद्या येतात, यांना ५२ विद्या कुठून आल्या. शिकला असता तर कळलं असतं असे म्हणत वायकर यांनी नर यांच्यावर टीका केली आहे. 

आम्ही कोणाच्याही घरगुती बाबतीत पडत नाही. मी त्याचं एफिडेविट पाहिलं. त्या ऍफिडेव्हिट फॉल्टी होतं. मी पहिल्याच दिवशी उडून लावला असतं त्या एफिडेविडमध्ये बापाचा पत्ता नव्हता. प्रत्येक पानावर स्टेप मारायचा असतो. माझ्यावर वेळ आली, त्यावेळी तुम्ही माझे सगळे सोयरे होतात. मी खड्ड्यात पडलो त्यावेळी तुम्ही मला हात द्यायला पाहिजे होता. तुम्ही मला हात दिला नाही. त्यावर माती टाकायचं काम काही लोकांनी केलं. मला जे सांगायचं होतं तुम्ही चार लोकांच सांगितलं चार लोकात बोललो आणि ही वेळ देवाने घडून आणली. मला लोकसभेत जायचं नव्हतं. त्या देवाची इच्छा होती, तुमची इच्छा होती. म्हणून मी खासदार झाले. माझे मिसेस कधीच राजकारणात येणार नाही. परंतु ते देवाने घडवला आहे. ते देवाने घडवल्यामुळे ती देखील विधानसभेत जाऊन तुमचे प्रश्न जोरदारपणे मांडीन असे वायकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT