Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Mumbai News: केवळ सोन्याच्या दोन दातांची माहिती; १५ वर्ष फरार आरोपी ताब्‍यात

केवळ सोन्याच्या दोन दातांची माहिती; १५ वर्ष फरार आरोपी ताब्‍यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कपडे विक्रीच्‍या व्‍यवसायात सेल्‍समन असलेल्‍या प्रविण आशुभा जडेजा उर्फ प्रविणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (वय ३८) याने मालकाचा विश्‍वासघात केला. यात पोलिसांनी (Police) अटक केल्‍यानंतर तो जामिनावर सुटला. परंतु, यानंतर तो फरार झाला. याबाबत पोलिसांकडून केवळ सोन्‍याचे दोन दात असलेला इसम इतकीच माहिती असताना त्‍याला अटक केली आहे. (Live Marathi News)

प्रवीण जडेजा हा ए. एच. गंगर (वय ४०) यांच्या हिंदमाता (Mumbai News) येथील कपडे विक्रीच्या व्यवसायात सेल्समन म्हणून नोकरीस होता. अन्य दुकानदारांकडून असलेली बाकी आणणेकामी गंगर यांनी त्यास विश्वासाने पाठवले. मात्र, ४० हजार रूपयांची रक्कम त्याने स्वतःकडेच ठेऊन घेऊन तिचा अपहार केला.

रक्‍कम चोरल्‍याची दिली खोटी माहिती

गंगर यांना त्याने सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेला असता, कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा खोटी माहिती दिली. तपासात त्यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीसांनी त्याला अटक केली. काही दिवसांनी प्रवीण हा जामीनावर सुटला. तो परत न्यायालयीन सुनावनीसाठी हजर राहिला नाही.

गाव, फोटोही नसल्‍याने अडचण

रफी याचे मूळगाव, फोटोही अभिलेखावर नसल्याने पोलिसांना त्याला शोधणे जिकरीचे बनले होते. न्यायालयाने त्याच्या विरोधात आजामीनपात्र वॉरंट जारी करून त्यास फरार घोषित केले होते. पोलिस तपासात त्याचे पुढील दोन दात सोन्याचे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी त्याचे मूळ गाव कच्छ (गुजरात) येथे असल्याचे निष्पन्न झाले. प्रवीणला पोलिसांनी LIC पॉलिसी मॅच्युअर झाल्‍याची कल्पकता वापरून मुंबईत बोलावत अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

SCROLL FOR NEXT