Mumbai-Nashik Highway Saam TV
महाराष्ट्र

Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

Mumbai-Nashik Highway Accident: अपघातावेळी कार फार वेगात होती. त्यामुळे जागीच दोघांचा मृत्यू झाला. रवी शिवराम धापटे आणि पप्पू शिवराम भला (राहाणार शिरोळ) यांचा जागीच मृत्यू झाला.

Ruchika Jadhav

Mumbai-Nashik:

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झालेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील ड्रीम हॉटेल जवळ ही घटना घडली आहे. एका चारचाकीने काही तरुण भरधाव वेगाने समोर येत होते. त्यावेळी अचानक वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी महामार्गालगत असलेल्या टेकडीवर जावून आदळली.

अपघातावेळी कार फार वेगात होती. त्यामुळे जागीच दोघांचा मृत्यू झाला. रवी शिवराम धापटे आणि पप्पू शिवराम भला (राहाणार शिरोळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्निल गावंडे व रवी बागडे हे गंभीर जखमी झाले असून यांना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात

पुण्यातही आज सकाळी अपघाताची मोठी घटना घडली. पहाटे ६ वाजेच्या सुमारास पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एक भीषण अपघात झाला. समोरून भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने प्रवाशांनी भरलेल्या एका खासगी बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेत डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील ७ ते ८ जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SCROLL FOR NEXT