fighting
fighting Saam Tv
महाराष्ट्र

बहिणीस पळवून नेल्याच्या रागातून युवकास मारहाण; भावांवर खूनाचा गुन्हा दाखल

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : बहिणीस पळवून नेल्याने तिच्या दाेन भावांसह नातेवाईकांनी एका युवकास (youth) मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने मुंबई नाका पोलिसांनी (mumbai naka police) युवतीच्या दाेन भावांसह नातेवाईकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. (nashik latest marathi news)

वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिलेल्या माहितीनूसार या प्रकरणात सचिन पाटील याचा मृत्यू झाला आहे. सचिन याची यापूर्वी त्याची दोन लग्न झाली हाेती. त्याला मुले देखील आहेत. सचिन याने सहवास नगर येथील एका युवतीला गुजरातमध्ये (gujarat) पळवून नेले होते.

संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी शोध घेत दोघांना गुजरात येथून सहवास नगर येथे आणले. त्यानंतर युवकास बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत युवक जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सचिन याचा मृत्यू झाल्याने संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे राेहकले यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atishi Marlena: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचं षडयंत्र; आप नेत्या आतिशींचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश; सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

PM Kisan Yojana: निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच खात्यात जमा होणार २००० रुपये

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

SCROLL FOR NEXT