Mumbai Rain Saam TV News
महाराष्ट्र

मुंबईकरांचे मेगाहाल! पश्चिम, मध्य अन् हार्बर लोकलला लेटमार्क, रस्त्यावरही वाहतूककोंडी, मोनो रेल विस्कळीत

Mumbai Heavy Rain: मुसळधार पावसामुळे रेल्वे उशिरा धावत आहेत, अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. मध्य रेल्वे १५–२० मिनिटे उशिरा, तर हार्बर लाईन लोकल १० मिनिटे उशिरा धावत आहेत.

Bhagyashree Kamble

  • मुंबईत मुसळधार पावसानं रेल्वे १०–२० मिनिटे उशिरा धावत आहेत.

  • माहीम, माटुंगा, दादर परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे.

  • पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

  • ठाणे-मुलुंड परिसरातील समस्यांवर मनसे आंदोलन करणार आहे.

गणेश चतुर्दशीनंतर पावसानं जणू पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या २ दिवसांपासून पाऊस बरसत आहे. संततधारेमुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काल रात्रीपासून पाऊस बरसत असल्यामुळे लोकलसह मोनो रेलही विस्कळीत झाली आहे. याचा थेट फटका सामान्यांना बसत आहे

कामगारांना लेटमार्कचा फटका

मुसळधार पावसामुळे मध्ये रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. कामाच्या पहिल्याच दिवशी कामगारांना लेटमार्कचा फटका बसला आहे. रविवारी रात्री मुंबईतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिरानं धावत आहे. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. रविवारच्या सुट्टीनंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, लोकल उशिराने धावत असल्यामुळे कामगारांना लेटमार्कचा फटका बसणार आहे.

माहीम, माटुंगा आणि दादर परिसर जलमय

मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे रूळांवर पाणी साचलंय. माहीम, माटुंगा आणि दादर परिसरातील रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. यामुळे पश्चिम रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावत असून, अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या कामगारांना याचा थेट फटका बसला आहे.

हार्बर लाईनवरील लोकल १० मिनिटं उशिरा

हार्बर लाईनवरील लोकलही उशिरानं धावत आहे. पनवेलवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल दहा मिनिटं उशिरानं धावत आहे. रिमझिम पावसामुळे खारघर रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

सतत पडणाऱ्या पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आठवड्याचा पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाला ऑफिस गाठण्यासाठी नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.

मनसे रस्त्यावर उतरणार

ठाण्यातील तीन हात नका ते मुलुंड टोल नाकामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याचा थेट फटक वाहनधारकांना बसला आहे. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून वाहने संथगतीने पुढे सरकत आहेत. खड्डे ,अर्धवट सुरू असलेली कामे आणि सिग्नल यंत्रणेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याच वाहतूक कोंडीचा प्रश्न घेऊन मनसे आज मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No Handshake मुळे भारतावर कारवाई होणार? वाचा ICC चा नियम काय सांगतो

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरसह वसई-विरार शहरात पावसाची रिपरिप

Nikhil Bane : फायनली ती माझ्या आयुष्यात आली; हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Majalgaon Rain : माजलगावमध्ये ढगफुटी; गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, गावांमध्ये पाण्याचा वेढा

Kalyan Crime : हॉस्पिटलच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याला लुबाडले, लाखो रुपये उकळले, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT