Mumbai Goa Highway : गेल्या दाेन दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे (Rain) घाट ररस्त्यांवर दरडी काेसळणे, नद्यांना पूर येणे असे प्रकार सध्या सुरु आहेत. हवामान विभागानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात येत्या 48 तासांचा रेड अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन देखील सज्ज झाले. आज (साेमवार) दुपारच्या सुमारास मुंबई गाेवा महामार्ग (mumbai goa highway) या महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
अंजणारीतील दत्त मंदिर पाण्यात
रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ पाणी वाढलं आहे. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नदी काठच्या सखल भागात पाणी शिरलं आहे. अंजणारीतील दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेल आहे. या मंदिराच्या सभोवती पुराचं पाणी साचलं आहे. (Ratnagiri Rain)
अर्जुना. कोदवली नदीस पूर
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरात पुरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. राजापूर बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे. अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे.
काजळी नदी धोक्याच्या पातळीवर
रत्नागिरीत सध्या पावसाची जोरदार बँटींग सुरु आहे. पावसामुळे काजळी नदिला पूर आलाय नदी काठच्या गावांत पाणी शिरलं आहे. चांदेराई, सोमेश्वर, तोणदे भागात पाणी शिरलं आहे. पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं आहे. काही ठिकाणी संपर्क तुटलाय. सध्या काजळी नदी धोक्याच्या पातळवरुन वाहत आहे. पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
भारजा नदीच्या पुलावर पाणी
बाणकोट पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचघर ते मांदिवली जोडणारा भारजा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी पाेलिस अधिका-यांनी भेट दिली.
साता-यात नदी काठच्या गावांना इशारा
सातारा जिल्ह्यात देखील दाेन दिवस जाेरदार पाऊस पडत आहे. वांग मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रामधील संततधार पावसामुळे वांग मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. धरणाची वक्र द्वारे बंद करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे येत्या ४८ तासात प्रकल्पाच्या सांडव्यावरुन प्रवाह सुरु होऊ शकतो. वांग नदी काठावरील सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नदी पात्रामध्ये प्रवेश करु नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.