Hitesh Mehta New India Bank Scam  SaamTV
महाराष्ट्र

मॅनेजरनेच लुटली 'न्यू इंडिया' बँक, खातेदारांच्या १२२ कोटींवर डल्ला, घामाच्या पैशांचं काय? किती पैसे मिळणार?

New India Co-operative Bank Scam : हितेशकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. कोरोना काळापासून मेहताकडून घोटाळा सुरू होता. मेहताने प्रभादेवीच्या शाखेतून ११२ तर गोरेगाव शाखेतून १० कोटी लाटले.

Prashant Patil

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजरने घोटाळा केलाय. त्यामुळे आरबीआयने बँकेवर निर्बंध लादलेत. मात्र मॅनेजरने बँकेला किती कोटींचा गंडा घातलाय? मेहताने बँक कशी लुटली? आणि बँक बुडाली तर ग्राहकांना किती पैसे मिळतात? याचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट.

हा आक्रोश आहे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांचा. न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहताने खातेदारांच्या तब्बल १२२ कोटींवर डल्ला मारलाय. तर याच घोटाळ्यामुळे आरबीआयने बँकेवर कठोर निर्बंध लादलेत. त्यामुळे खातेदार हवालदिल झाले आहेत. न्यू इंडिया बँकेचा मॅनेजर हितेश मेहताने बँकेतील १२२ कोटी लाटल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या आहेत. हितेश मेहताने ठेवीदारांच्या ठेवीवर कसा डल्ला मारला पाहूयात.

हितेशकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. कोरोना काळापासून मेहताकडून घोटाळा सुरू होता. मेहताने प्रभादेवीच्या शाखेतून ११२ तर गोरेगाव शाखेतून १० कोटी लाटले. घोटाळ्याचा पैसा नातेवाईक आणि मित्रांच्या खात्यावर वळवल्याची माहिती समोर आली आहे. जर पाच वर्षांपासून हा घोटाळा सुरू होता तर रिझर्व्ह बँकेनं ऑडिट का केलं नाही? असा सवाल उपस्थित करत मेहताच्या वकीलांनी रिझर्व्ह बँकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.

लोकं बँकेत आपल्या आयुष्याची जमापूंजी ठेवतात. मात्र घोटाळ्यामुळे किंवा बँक बुडाली तर खातेदारांना किती पैसे काढता येतात? यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने नियमावली जारी केलीय.

बँक बुडाली तर किती पैसे मिळणार?

ग्राहकांच्या ठेवींना ५ लाखांचं विमा संरक्षण

बँक बुडाल्यास ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळणार

कागदपत्रांच्या तपासानंतर ९० दिवसात ठेवींचे पैसे मिळणार

मात्र ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास त्यावरील रक्कम बुडणार

अनेकदा बँकेचं संचालक मंडळ, मॅनेजर हे घोटाळा करतात आणि त्यामुळे खातेदार उध्वस्त होतात. अशा घटना घडूच नयेत आणि सर्वसामान्य खातेदार उध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कठोर नियमावली तयार करायला हवी. एवढंच नाही तर सातत्याने बँकांचं ऑडिट करुन घोटाळे होण्याआधीच त्यांना पायबंद घालायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT