Mumbai Crime News Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Crime News: महिलेवर अंधाधुंद गोळीबार करणारे आरोपी पोलिसांच्या अटकेत; घटनेमागचं खरं कारण काय?

हल्ला केल्यानंतर घटनेतील दोन्ही आरोपी फरार होते.

जयश्री मोरे

Mankhurd Crime News : मुंबईच्या मानखुर्द येथे ३० एप्रिल रोजी गोळीबाराची मोठी घटना घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय. शेजारच्यांशी झालेल्या वादातून महिलेवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली. हल्ला केल्यानंतर घटनेतील दोन्ही आरोपी फरार होते. या आरोपींना शोधण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. (Latest Marathi News)

शनिवारी घडलेल्या या धक्कादायक घटनेत मानखुर्द (Mankhurd) पोलिसांनी गुन्हा दाखल करत, आरोपींना शोधण्यासाठी १४ पथके तयार केली होती. या पथकांनी तपास करत रविवारी रत्नागिरी येथून गोळीबार करणाऱ्या सोनू सिंह (४२) आणि अतिष सिंह (२२) याना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, मानखुर्द परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबातील महिलांमध्ये भांडण झाले. यातील एका महिलेच्या पती आणि मुलाने दुसऱ्या महिलेवर गोळीबार केला यात तिचा मृत्यू झाला. दोन्ही आरोपींचा शोध लागला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या शुल्लक वादातून ही घटना घडली आहे. सदर घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये (Video) गोळीबार झाल्याची संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

SCROLL FOR NEXT