Bilkis Bano Case Update : बिल्किस बानो प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; सरकारच्या विरोधात निर्णय जाण्याची शक्यता

Bilkis Bano Case News : हे असे प्रकरण आहे ज्यामध्ये गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि
BILKIS BANO CASE UPDATE
BILKIS BANO CASE UPDATESaam TV
Published On

Crime News : बिल्किस बानो प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज सुनावणी होणार आहे. मागची सुनावणी १८ एप्रिलला पार पडली होती. यावेळी न्यायालयाने गुजरात सरकारने दोषींना अगोदर का सोडले? असा सवाल सर्वोच्च उपस्थित केला होता. न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि बीव्ही नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. जोसेफ यांनी आत्तापर्यंत दिलेले निर्णय पाहाता निर्णय सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना गुजरात सरकारने शिक्षेत दिलेल्या सुटकेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. न्यायालयाने दोषींना सोडण्यासंदर्भात सर्व फाईल न्यायालयाला 1 मे पर्यंत सादर करण्याचे आदेश गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारने दोषींना का सोडून दिलं याची फाइल सादर करण्यास विरोध केला होता. यावर न्यायालयाने जर तुम्ही दोषींना सोडण्याचे कारण सांगितले नाही तर आम्ही आमचाच निष्कर्ष काढू, अशा शब्दात सरकारला सुनावले होते.

BILKIS BANO CASE UPDATE
Kalyan Crime News: हातावर फटका द्यायचे अन् मोबाईल घेवून पळायचे... ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या 'फटका गँग'चे दोन चोरटे गजाआड; ३ जण पसार

काय म्हटलं होत न्यायालयाने?

ज्या पद्धतीने दोषींनी अपराध केला तो भयानक असल्याची टिपण्णी केली तसंच एक आरोपी १ हजार दिवस आणि दुसरा आरोपी १५०० दिवस जामीनावर होता असंही निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं.

हे असे प्रकरण आहे ज्यामध्ये गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिच्या सात नातेवाईकांची हत्या करण्यात आली. तुम्ही सफरचंदाची तुलना संत्र्याशी कशी करू शकता? एका व्यक्तीच्या हत्येची तुलना सामूहिक हत्याकांडाशी कशी करता येईल? आम्हाला असे वाटते की, तुम्ही तुमची शक्ती आणि विवेकाचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी केला पाहिजे. दोषींना सोडून तुम्ही काय संदेश देत आहात?

BILKIS BANO CASE UPDATE
Beed Crime: बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री आठ ते दहा दुकाने फोडली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

तुम्ही कोणीही असाल, कितीही उच्च पदावर असाल, ते जनतेच्या हितासाठी असावे. हा समाज आणि समाजाविरुद्ध गुन्हा आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला सांगितले की, आज ती बिल्कीस आहे, उद्या ती दुसरी कोणीतरी असू शकते. समाजाच्या भल्यासाठी राज्याने पावले उचलली पाहिजेत.

११ दोषींच्या सुटकेवर बिल्किस बानोची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. बिल्कीस बानोवर अत्याचार करणाऱ्या दोषींची शिक्षा पूर्ण होण्याअगोदर गुजरात सरकारने शिक्षा माफ केली होती. त्या विरोधात स्वत: पीडित बिल्किस बानोसह, खासदार महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केल्या आहेत.

बिल्किस बानो यांनी 30 नोव्हेंबर ला दोन याचिका दाखल केल्या आहेत. पहिल्या याचिकेत 11 दोषींच्या सुटकेला आव्हान देत त्यांना त्वरित तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे. तर दुसऱ्या याचिकेत मे महिन्यात दिलेल्या न्यायालयाच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दोषींच्या सुटकेचा निर्णय गुजरात (Gujrat) सरकार घेईल. असं न्यायालयाने म्हटलं होतं यावर बिल्किस यांनी खटला महाराष्ट्रात सुरू असताना गुजरात सरकार निर्णय कसा घेणार? असा सवाल उपस्थित करत दोन याचिका दाखल केल्या आहेत. गुजरात मध्ये 2002 मधील दंगली दरम्यान बिल्कीस बानोवर अत्याचार करणाऱ्या या दोषींना गुजरात सरकारच्या शिफारसी वरून 15 ऑगस्टला सोडण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com