Coastal Road Haji Ali Car Accident SaamTV
महाराष्ट्र

Mumbai Coastal Car Accident : भरधाव कार डिव्हायडवर आदळल्याने उलटली, पती-पत्नी गंभीर जखमी; मुंबईत भीषण अपघात

Mumbai Hajili Swift Car Accident : अपघातात गंभीर जखमी झालेली तरुणी सध्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून तिच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत.

Prashant Patil

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवरील हाजीअली परिसरात आज रविवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला आहे. वेगात असलेली स्विफ्ट कार दुभाजकावर आदळून पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात कारमधील पती आणि पत्नी जखमी झाले असून, दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास, कोस्टल रोडवरील हाजीअली परिसरातील मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली. स्विफ्ट कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजकावर आदळली. धडकेनंतर कार पलटी होऊन रस्त्यावरच उलटली. अपघाताची तीव्रता इतकी होती गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

अपघातात गंभीर जखमी झालेले पती-पत्नी सध्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. कार चालवत असलेला तरुण किरकोळ जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. गाडीचा वेग खूप जास्त असल्याने हा अपघात झाला आहे. दारूच्या नशेत गाडी चालवली जात होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT