पुण्यातल्या देहूरोड येथील मुंबई- बंगळुरू महामार्गावर १५० निष्पाप लोकांचे अपघातामुळे बळी गेले. यानंतर आता सरकारला जाग आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून भुयारी मार्ग तयार करण्यात यावा यासाठी मागणी केली जात होती. यासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आले. अखेर ग्रामस्थांना चौदा वर्षानंतर यश आले आहे. या ठिकाणच्या भूयारी मार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे.
देहूरोड येथील मुंबई- बंगळुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर भुयारी मार्ग बनविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यासाठी २१ कोटी ७१ लाख ४८ हजार १०१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदाही काढण्यात आली आहे. मात्र यासाठी १५० पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचे बळी या राष्ट्रीय महामार्गाने घेतले आहे. त्यासाठी देहूरोड मधील नागरिकांनी मोर्चे, आंदोलन, रस्तारोको केल्यानंतर शिंदे पेट्रोल पंपाजवळ भुयारी मार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान देहू रोडच्या विकासनगर किवळे येथील शिंदे पेट्रोल पंप ते त्याच्या समोर असलेल्या उत्तम नगर, देवी वन आणि लेखा फार्म हाऊसकडे जाण्यासाठी नागरिक आपला जीव मुठीत धरून, राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जात असत. त्यात शालेय विद्यार्थी, नागरिक तसेच लग्न समारंभासाठी आलेले वऱ्हाडी मंडळी लेखा फार्मकडे धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत होते. यात २०२३ पर्यंत सुमारे १५० निष्पपाप नागरिकांचा बळी गेला आहे. याची अधिकृत माहिती देहूरोड पोलिस ठाण्याकडून सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे यांना मिळाली आहे.
धर्मपाल तंतरपाळे आणि ग्रामस्थांनी २०१४ पासून याच ठिकाणी आंदोलन केले. त्याची दखल, शासनाकडून घेतली गेली नाही. त्यानंतर सातत्याने, विकासनगर किवळे गावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने, अनेक आंदोलने केली. रास्ता रोको, धरणे आंदोलन, जेल भरो आंदोलन, अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन, उपोषण, भर उन्हात रस्त्यावर झोपणे, मशाल मोर्चा अशा विविध मार्गाने अनेक वेळा आंदोलने केली आणि त्यांच्या मागणीला अखेर यश आले. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांनी या भुयारी मार्गास मंजुरी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.