Mumbai Goa Highway Dhule Accident News Saam TV
महाराष्ट्र

Dhule Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर खासगी बसची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Mumbai Goa Highway Dhule Accident News : मुंबई आग्रा महामार्गावर खासगी बसने दिलेल्या धडकेत एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

Dhule Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव खासगी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नगाव परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. अनिल गुलाब पाटील (वय 55) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अनिल पाटील हे नगाव परिसरातील शेतकरी होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास ते शेतातून दुचाकीने घरी परतत होते. त्याचवेळी धुळे शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नगाव परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर एका खासगी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, अनिल पाटील हे बसच्या चाकाखाली आले. अंगावर चाक गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या फरार असलेल्या बसचालकाचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT