Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर वेगवान कारचा कहर पाहायला मिळाला. अतिवेगात आलेल्या कारने रिक्षा आणि दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू (Accident Death) झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र घटनास्थळावरून कारचालकाने पळ काढला असून आता वनराई पोलीस (Police) कार चालकाचा शोध घेत आहेत. (Tajya Batmya)

पश्चिम द्रुतगती महामार्गावर कारचालक भरधाव वेगाने कार चालवत होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जय कोच सिग्नलवर कार पोहोचताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यानंतर गाडी दुसऱ्या बाजूला गेल्याने रिक्षा आणि दुचाकीला जाऊन (Accident) धडकले. यात रिक्षातील प्रवासी आणि रिक्षा चालक या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षातील अनेक प्रवासी आणि दुचाकीस्वार हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

वाहन चालकाविरोधात गुन्‍हा

जखमींना जवळच्या हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वनराई पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात आयपीसी 279, 304(A) 338 आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या वनराई पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT