Dhule: वाहनधारकांकडून पावणेपाच लाख दंड वसुल; आठ दिवसांतील कारवाई

वाहनधारकांकडून पावणेपाच लाख दंड वसुल; आठ दिवसांतील कारवाई
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : शहर वाहतूक शाखेने वाहनधारकांकडून आठ दिवसांत प्रलंबित पावणेपाच लाख रुपये दंड वसूल केला. दरम्यान, जिल्ह्यातील (Dhule News) ज्या वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांवरील प्रलंबित दंडाची रक्कम अद्याप भरलेली नाही, त्यांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी दंडाची रक्कम भरावी, असे आवाहन धुळे (Dhule) जिल्हा पोलिस दल व शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, दंडाची रक्कम प्रलंबित असलेल्या वाहनधारकांना १२ नोव्हेंबरला होणाऱ्या लोकअदालतीत उपस्थित राहण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

Dhule News
रब्बीत केवळ ११ टक्के कर्ज वाटप; राष्ट्रीयकृत बँकांची पीककर्ज वाटपासाठी उदासीनता

धुळे शहर वाहतूक शाखेतील (Traffic Police) अधिकारी व अंमलदार यांनी १ ते ८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वाहनांवर प्रलंबित असलेल्या ९६७ चलनांचे तीन लाख ५९ हजार ४५० रुपये रोखीने, तर १३६ चलनांचे एक लाख १४ हजार ४५० रुपये क्यूआरकोड व एटीएमद्वारे वसूल केले. तसेच नागरिकांच्या तक्रारींचा निपटाराही केला. धुळे जिल्ह्यातील ज्या वाहनधारकांच्या वाहनावर दंडाची रक्कम प्रलंबित आहे त्यांनी ती लवकरात लवकर भरावी व पुढील न्यायालयीन प्रक्रिया टाळावी.

न्यायालयाची कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी त्यांच्याकडे असलेल्या दंडाची रक्कम शहर वाहतूक शाखा (धुळे) किंवा आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत भरून घ्यावी. आपल्या वाहनावरील दंडाची रक्कम पाहण्यासाठी मोबाईलवरील Mahatraffic App या सुविधेचा लाभ घ्यावा. दंडाची रक्कम क्यूआर कोड, रोख, एटीएमद्वारे भरता येते, असे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com