Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Mumbai News : 'एसआरए' प्राधिकरणासाठी अभियंत्यांकडून लॉबिंग; 'साम टिव्ही' च्या बातमीनंतर  दुय्यम अभियंत्याचा पदभार रद्द

Rajesh Sonwane

संजय गडदे

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये सर्व ३३ (११) योजनेअंतर्गत सर्व दुय्यम आणि सहाय्यक अभियंत्यांना समान काम वाटप करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व अभियंत्यांशी चर्चा करून पारदर्शकता राखण्यासाठी लॉटरी पद्धतीने सर्व दुय्यम आणि सहाय्यक अभियंत्यांना क्षेत्र वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ठरल्याप्रमाणे लॉटरी न काढता निवडक दुय्यम आणि सहाय्यक अभियंत्यांना फलदायी क्षेत्रे थेट दिली जात असल्याची चर्चा एसआरए कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये रंगू लागली आहे. 

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये वर्षभरापूर्वी सर्व योजनांचे काम एकाच सहाय्यक अभियंत्याकडे सोपवून इतर सहाय्यक अभियंत्यांवर अन्याय करण्यात आला. त्यावेळी एका दुय्यम अभियंत्याकडे सर्व ३३ (११) योजनांचा कार्यभारही देण्यात आला होता. पण 'साम टीव्ही'ने या संदर्भात दिलेल्या बातम्यांनंतर दुय्यम अभियंत्याचा पदभार रद्द करण्यात आला. मात्र राजकीय पाठिंब्यामुळे सहाय्यक अभियंत्याचा पदभार रद्द करण्यात आलेला नाही. तसेच, एक दुय्यम अभियंता सहाय्यक अभियंत्याचा अतिरिक्त कार्यभार आपल्या नियमित कार्यभारासोबतच गेल्या दोन वर्षांपासून उपभोगत आहे. दरम्यान या कामाच्या वाटपामध्ये मागील दोन वर्षापासून सहाय्यक अभियंता पदाचा कार्यभार सांभाळत असलेल्या एका दुय्यम अभियंत्याला पुन्हा सहाय्यक अभियंता पदाचा लाभ मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

फलदायी क्षेत्रासाठी आर्थिक देवाण घेवाणीची चर्चा 
नवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मे २०२४ पासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच सर्व दुय्यम आणि सहाय्यक अभियंत्यांना समान काम वाटप करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी सर्व अभियंत्यांशी चर्चा केल्या आणि पारदर्शकता राखण्यासाठी लॉटरी पद्धतीने क्षेत्र वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता ठरल्याप्रमाणे लॉटरी न काढता निवडक दुय्यम आणि सहाय्यक अभियंत्यांना फलदायी क्षेत्रे थेट दिली जात असल्याची चर्चा एसआरए प्राधिकरणात रंगली आहे. यासाठी राजकीय वरदहस्त या सोबतच मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याचीही चर्चा अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.

या कामाच्या वितरणात HW, HE, KW, KE, PS आणि PN वॉर्डातील प्रभावशाली कार्यकारी अभियंत्यांनी राजकीयदृष्ट्या आपले कार्यक्षेत्र कायम राखले आहे. त्यांची उच्च हातमिळवणी आणि हुकूमशाही थांबवण्यासाठी या कार्यकारी अभियंत्यांची बदली होणे गरजेचे असल्याचे प्राधिकरणातील अभियंत्यांचे म्हणणे आहे.सर्व अभियंत्यांची लॉटरी काढण्याऐवजी काही निवडक अभियंत्यांना प्राधान्याने पदस्थापना दिल्यास या प्रकरणातील गैरप्रकार होत आहेत यावर शिक्कामर्तब होईल. सर्व अभियंते दुय्यम, सहाय्यक आणि कार्यकारी यांना समान काम वाटपात न्याय मिळेल की पुन्हा पदस्थापना पैशाच्या आणि राजकीय ताकदीने ठरवली जाईल.हे मात्र येणार काळ ठरवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT