Hit and run incident in Maharashtra  Saam tv
महाराष्ट्र

Hit and Run Cases : पुणे ते मुंबई...! राज्यात 'हिट अँड रन'चा धुमाकूळ; मागील २ महिन्यांत कुठे-कुठे घडल्या थरारक घटना, वाचा सविस्तर

Hit and run incident in maharashtra : राज्यात हिट अँड रनच्या घटनांनी धुमाकूळ घातलाय. मुंबई आणि पुण्यात तर या घटनांची मालिकाच सुरू आहे. काल पिंपरीत भरधाव कारनं महिलेला उडवलंय तर आज मुंबईतल्या मुलुंडमध्ये भरधाव कारनं रिक्षावाल्याला धडक दिलीय. नेमक्या कशामुळे या घटना घडतायत आणि बड्या धेंडांच्या मुजोर मुलांना नेमकी कसली मस्ती आलीय? यावरचा हा रिपोर्ट...

Tanmay Tillu

मुंबई : राज्यातल्या सर्वच प्रमुख शहरांत दिवसेंदिवस हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होतेय.. त्यातच मुंबई आणि पुण्यात या घटनांमध्ये कमालीची वाढ झालीय. पिंपरी-चिंचवड परिसरात आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आलीय. एका चार चाकीनं महिलेला जोरदार धडक देऊन उडवल्याचं समोर आलंय.. महिलेला धडक दिल्यानंतर या कार चालकानं समोर असलेल्या दुचाकीला आणि रिक्षालाही धडक दिली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. या घटनेचं धडकी भरवणारं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.

तर मुंबईतल्या मुलुंडमध्ये भरधाव ऑडीचालकानं दोन रिक्षांना जबर धडक दिली. यात दोन्ही रिक्षांचा चुराडा झालाय. दोन्ही ऑटोचालक आणि दोन प्रवाशी यात जखमी झालेत. त्यातील एका ऑटोचालकाची प्रकृती गंभीर आहे. रिक्षांना धडक देऊन ऑडी चालक फरार झालाय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनचे डझनभर गुन्हे नोंदवले गेलेत. त्यामुळे रस्त्यावरुन चालताना नागरिक धास्तावलेत..

राज्यात हिट अँड रनचा धुमाकूळ

19 मे – पुणे कल्याणीनगर भागात पोर्श कारच्या ध़डकेत 2 जणांचा मृत्यू

7 जुलै - मुंबईतील वरळीत BMW कारनं महिलेला चिरडलं

8 जुलै - पुणे - गस्तीवरील दोन पोलिसांना भरधाव कारची धडक, एकाचा बळी

9 जुलै - नाशिकात त्र्यंबकेश्वर रस्त्यावर युवकाला भरधाव कारनं उडवलं

9 जुलै - नाशिक- गंगापूर रस्त्याजवळ भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

7 जुलै - नाशिक - कॉलेज रोड परिसरात भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

11 जुलै - नागपुरात भरधाव कारनं 6 वर्षांच्या चिमुरडीला चिरडलं

18 जुलै - पुणे - माजी नगरसेवकाच्या मुलाची टेम्पोला धडक - टेम्पोचालक आणि क्लीनर गंभीर जखमी

गेल्या दोन महिन्यात सातत्यानं हिट अँड रनच्या घटनांनी अक्षरशः धूमाकूळ घातलाय. मद्यधुंद अवस्थेतील तरुणाई यामागे आहे. काही बिल्डरपुत्र आहेत तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांची कार्टी. त्यामुळे कायद्याच्या चौकटीचं भय या बड्या नेत्यांच्या मुजोर मुलांना नाही. बाप आहे मोठा, हिट अँड रनला नाही तोटा अशा माजात सध्या ही तरुणाई दिसते. मात्र त्यामुळे बळी जातात ते सामान्य निष्पापांचे...राज्यात सामान्यांसाठी मरण स्वस्त झालंय...असं वास्तव घटनांमधून समोर येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT