श्रीवर्धन-म्हसळा रस्त्यावर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू saam tv
महाराष्ट्र

Accident news : बसमधून उतरल्या, रस्ता ओलांडताना भरधाव कारने उडवले; सोबतच्या महिलेला वाचवताना गमावला जीव

Maharashtra Accidents : महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरीमध्ये तीन ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडल्या. रायगडमधील श्रीवर्धन-म्हसळा रस्त्यावरील अपघातात महिलेचा मृत्यू झाला. तर मुंबई-गोवा महामार्गावरील कार अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. माथेरान घाटातही कार रेलिंग तोडून खड्ड्यात पडली.

Nandkumar Joshi

  • म्हसळा- श्रीवर्धन मार्गावर अपघात

  • कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

  • रस्ता ओलांडताना घडली घटना

  • सोबतच्या महिलेला वाचवताना गमावला जीव

सचिन कदम/विकास मिरगणे/अमोल कलये

रायगड जिल्ह्यात मनाला चटका लावणारी घटना घडली. श्रीवर्धन-म्हसळा रस्त्यावर भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने उडवले. त्यात जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. किशोरी जावळेकर असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी जावळेकर आणि प्राजक्ता गोगरकर या दोघी श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर वाडांबा गावच्या फाट्यावर बसमधून खाली उतरल्या. रस्ता ओलांडताना भरधाव कार समोरून आली.

प्राजक्ता यांचं आपल्याच दिशेने येणाऱ्या भरधाव कारकडे लक्ष नव्हते. त्याचवेळी किशोरी याचं लक्ष गेलं. त्यांनी जिवाची पर्वा न करता प्राजक्ता यांना वाचवण्यासाठी त्यांना मागे खेचले. यात प्राजक्ता थोडक्यात बचावल्या. पण किशोरी यांना कारची जोरदार धडक लागली. या धडकेत किशोरी यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालक सोहम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरही भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. राजापूरच्या हातिवले टोल नाक्याजवळ ही दुर्घटना घडली.

मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणारी कार अचानक थेट ट्रकच्या खाली घुसली. अपघातानंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

माथेरान घाटात पुन्हा अपघात, ट्रायलची कार थेट खड्ड्यात

माथेरान घाटातील अपघातांची मालिका सुरूच आहे. जुमापट्टी स्थानकाजवळील वळणावर आज, शुक्रवारी पुन्हा अपघात घडला. चालकाचं ट्रायलसाठी आणलेल्या कारवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला.

एका कारची ट्रायल सुरू होती. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं. कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन लोखंडी सुरक्षा रेलिंग तोडून थेट खड्ड्यात पडली. कारमध्ये तीन तरूण होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. कारचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT