CM Eknath Shinde On Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

डाॅ. माधव सावरगावे

''तुम्ही आमची ताकत वाढवा, दीड हजाराचे दोन करणार, दोन हजाराच्या अडीच हजार करणार, अडीच हजार ते तीन हजार करणार. तुम्हाला आम्हाला लखपती झाल्याचे पाहायचे आहे. ज्या दिवशी सगळ्या बहिणी लखपती होतील, त्या दिवशी समाधानाचा दिवस असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''ही योजना सुरू झाल्यावर चूनावी जुमला म्हणाले. पण हे सरकार देना बँक आहे, ले ना बँक नाही. महिला सक्षमीकरणसाठी महाराष्ट्र देशाला दाखवणारे आहे, असे काल पंतप्रधान म्हणाले. सावत्र भावांनी खोडा दाखवला.''

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''दुष्ट भावाला योग्य वेळी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे. तोंड आहे म्हणून वाट्टेल ते सावत्र भावांनी बोलायचे का? माझ्या बहिणी दुर्गा सावित्री आहेत. पण यांच्या लाडक्या बहिणीच्या वाट्याला गेले तर तुमचे दिपोझित गुल होईल. नागपूर कोर्टात गेलात, कुठं फेडाल हे पाप.''

ते म्हणाले, ''कोविडमध्ये खिचडी, बॉडीबॅगमध्ये पाप केले. ही योजना कोणाचाही बाप आला, तरी बंद होणार नाही. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना निवडणुकांसाठी नाही. पैसे अॅडव्हान्स देणारे आहे. ठेकेदारांची अॅडव्हान्स पैसे घेणार नाही.''

शिंदे पुढे म्हणाले, ''आचारसंहिता लागली की, हे सावत्र भाऊ कुठेतरी मांजर आडवा घालतील. त्यामुळे दिवाळीपूर्वी दोन महिन्याचे पैसे दिले आहेत. आमची नियत साफ आहे. देण्याची प्रामाणिक इच्छा आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेचं नेमकं गणित

SCROLL FOR NEXT