Sanjay Raut on Maharashtra Government Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Sanjay Raut on Maharashtra Government: सरकारच्या लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार तरी होतील का? असा सवाल विरोधक उपस्थित करतायेत.

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झालेल्या सत्ताधारी महायुती सरकारसाठी लाडकी बहिण योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. कारण राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालाय. मात्र सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेत सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आलेला आहे.

राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून 1500 रुपये प्रति महिना असे तीन हजार रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा केलाय. आतापर्यंत सुमारे एक कोटी 25 लाखांच्या वर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत. या योजनेचा तिजोरीवर मोठा भार झाला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सोडा साधा पगार तरी मिळेल का? असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

राज्याच्या 2024-25 च्या बजेटमध्ये काय करण्यात आली आहे तरतूद?

1 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

2 कर्मचारी पगार, निवृत्ती वेतन, कर्जाच्या व्याजासाठी खर्च 53% म्हणजेच 2 लाख 64 हजार 341 कोटी.

3 अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद.

4 महसूली जमा 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये.

5 महसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी रुपये.

6 भांडवली तसंच इतर खर्च 47% म्हणजेच 2 लाख 34 हजार 416 कोटी.

या योजनेवरुन विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर सातत्यानं टिका होतेय. मतांसाठी ही योजना असल्याचा निशाणा साधला जातोय. राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना ही योजना राबवणे तारेवरची कसरत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेचे काय होणार असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT