Ladki Bahin Yojana  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

Ladki Bahin Yojana October payment : लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर आजपासून १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली असून १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Ladki Bahin Scheme October ₹1500 installment Update : महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर आजपासून १५०० रूपये खटाखट जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील पात्र लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ऑक्टोबरचे १५०० रूपये जमा होतील, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय. आजपासून १५०० रूपयाचे वितरणाची प्रक्रिया सुरू कऱण्यात आली आहे. टप्याटप्प्याने पुढील दोन दिवसात सर्व पात्र महिल्यांच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. सर्व महिलांनी केवायसी करावी, असेही आवाहन तटकरेंनी केलेय. त्यासाठी त्यांनी अंतिम तारीखही (Deadline for Ladki Bahin e-KYC completion) सांगितली आहे.

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाडक्या बहि‍णींमध्ये उत्सुकता होती. अखेर, ही प्रतिक्षा संपली आहे. राज्यातील सर्व लाडक्य बहि‍णींच्या खात्यावर आजपासून १५०० रूपये वितरीत केले जाणार आहे. आदिती तटकरेंनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी आणि काही पुरूषांनीही घेतल्याचे समोर आले. त्यानंतर या योजनेसाठी आता प्रत्येकवर्षी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी मंत्रालयाकडून ठराविक कालावधी देण्यात आला आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई केवायसीबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

घरबसल्या करा ई-केवायसी - Ladki Bahin e-KYC online process step by step

https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा

e-KYC पर्यायावर क्लिक करा

रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड भरा

आधार क्रमांक टाकून व्हेरिफेकेशन करा

'मी सहमत आहे' पर क्लिक करा

OTP पर क्लिक करा

मोबाइलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा

दोन दिवसात खात्यावर पैसे जमा होणार - How to check ₹1500 Ladki Bahin Yojana payment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचे १५०० रूपये वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होईल. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील सर्व पात्र लाभार्थांच्या खात्यावर १५०० रूपये जमा होतील, असे तटकरेंनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT