Ashadhi Wari 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2023: वारकरी भक्तांसाठी आनंदवार्ता! आषाढीच्या शासकीय महापूजेच्या कालावधीत विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन सुरू राहणार

शासकीय महापूजेच्या काळात देखील मुखदर्शन‌‌ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत नागणे

Pandharpur Wari 2023: आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. वारी काळात भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुलभ व‌ जलद व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या कालावधीत मुखदर्शन सुरू राहणार आहे. (Latest Marathi News)

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी तशा सूचना मंदिर समितीला दिल्या आहेत. त्यामुळे मुखदर्शन रांगेवर येणारा ताण कमी होणार आहे. 29 जून‌ रोजी आषाढी एकादशी आहे. पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे.

शासकीय महापूजे दरम्यान पदस्पर्श व‌ मुखदर्शन सुमारे दोन तास बंद ठेवले जाते. शासकीय महापूजे दरम्यान मुखदर्शन‌ रांगेवर मोठा ताण येतो, तो ताण कमी करण्यासाठी शासकीय महापूजेच्या काळात देखील मुखदर्शन‌‌ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pandharpur News)

शिवाय मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजे नंतर वारी काळातील व्हीआयपी दर्शन देखील बंद ठेवण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा आषाढी यात्रा नियोजन बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापूजे दरम्यान मुखदर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे वारकऱ्यांमधून स्वागत केले‌ जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT