MSRTC saam tv
महाराष्ट्र

ST Workers: महिन्याची १० तारीख उलटली तरी पगार नाही; एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला संताप

पगार उशिराने होण्यासाठी अर्थ खात्यातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MSRTC: मागील वर्षी झालेल्या ऐतिहासिक संपानंतर वेळेत आणि चांगले वेतन हाती येईल अशी अपेक्षा व्यक्त केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. या महिन्यातही 10 तारीख उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना (MSRTC) पगार मिळाला नाही.

त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना असून पगार उशिराने होण्यासाठी अर्थ खात्यातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील एसटी कामगारांचं वेतन पुन्हा एकदा थकले आहे. फेब्रुवारी महिन्याची दहा तारीख उलटली तरी जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप एसटी कामगारांच्या खात्यावर जमा झालेले नाही. उद्या शनिवार व नंतर रविवार असल्याने पुढील दोन दिवसातही एसटी कर्मचऱ्यांना वेतन मिळणे कठीण दिसत आहे.

एसटी कामगारांना दर महिन्याच्या दहा तारखे आधी वेतन देण्याची हमी राज्य शासनाने उच्च न्यायालयामध्ये दिली आहे. मात्र ही हमी पाळण्यात राज्य शासन पुन्हा एकदा अपयशी ठरलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कामगारांना दिलासा देणार का? असा प्रश्न एसटी कामगारांमधून विचारला जात आहे.

एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे सरकारच्या बजेटमध्ये तरतुद केली जाईल आणि महिन्याला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारच्यावतीने संप काळात न्यायालयात मान्य करण्यात आले होते.

जानेवारी महिन्यात 19 तारखेला एसटी महामंडळाने मागील सहा महिन्यांच्या वेतन रकमेतील थकीत रकमेसह या महिन्याच्या वेतनासाठी 1000 कोटी रुपयांची मागणी लेखी पत्राद्वारे राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे केली होती पण या महिन्याची 10 तारीख उलटून गेली तरी सरकार कडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

SCROLL FOR NEXT