Update regarding MSRTC NCMC cards for women traveling on ST buses saam tv
महाराष्ट्र

MSRTC Update : एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मोठा निर्णय; NCMC कार्डसाठी मुदत वाढवली

Maharashtra ST Bus Update : एसटी प्रवासातील सवलतीसाठी लागणाऱ्या 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड'च्या सक्तीला महामंडळाने ब्रेक लावला आहे. ग्रामीण भागातील महिलांची नोंदणी बाकी असल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे.

Saam Tv

एसटी महामंडळाच्या प्रवासात सवलत मिळवण्यासाठी 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' काढण्याची घाई असलेल्या महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. हे कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय आता पुढे ढकलण्यात आला आहे. ग्रामीण भागातील महिलांची झालेली अडचण आणि सामाजिक संघटनांच्या मागण्या लक्षात घेऊन परिवहन मंत्र्‍यांनी हा निर्णय जाहिर केला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांमधून महिलांना मिळणाऱ्या प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' NCMC Card अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या काळात कार्ड नसतानाही महिलांना सवलतीत प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

शासनाच्या निर्देशानुसार सवलतींचा लाभ सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने हे स्मार्ट कार्ड वितरण सुरू केले आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी व वितरण झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांची नोंदणी अजूनही बाकी असल्याचे समोर आले आहे.

विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून महामंडळाने मुदतवाढीचा हा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे

राज्यातील प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यापर्यंत कार्ड पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाईल. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत १०० टक्के नोंदणी व कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. या वाढीव कालावधीत सर्व महिलांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार; ५ हजार कुटुंबांना किराणा किटचे वाटप

Saturday Horoscope: ७ नोव्हेंबरला 'या' राशींचे नशीब चमकणार; कोणाला मिळणार आनंदाची बातमी?

Bank Holiday 2026 : ८ नोव्हेंबरपासून बँका राहणार बंद; तुमच्या राज्यातील सुट्ट्यांची यादी पाहा

Mix Veg Bhaji Recipe: रोजच्या भाजीचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा चविष्ट मिक्स व्हेज भाजी, वाचा रेसिपी

अजितदादांचीही इच्छा होती! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार गटाचा गौप्यस्फोट|VIDEO

SCROLL FOR NEXT