Dattatreya Jayanti 2022, Maharashtra, Karnataka, ganagapur
Dattatreya Jayanti 2022, Maharashtra, Karnataka, ganagapur  saam tv
महाराष्ट्र

Dattatreya Jayanti 2022 : भाविकांनाे ! कर्नाटकातील गाणगापूरला एसटीने जाणार आहात ? मग हे वाचाच

विश्वभूषण लिमये

Dattatreya Jayanti 2022 : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Karnataka Maharashtra Border Dispute) प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने साता-यातून कर्नाटकात जाणाऱ्या बसच्या फेऱ्यांत बदल केलेला आहे. परंतु सोलापुरातून थेट कर्नाटकापर्यंत बस साेडल्या जात आहेत. दत्त जयंतीच्या पार्श्वभुमीवर निर्णय घेतल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

दत्त जयंती निमित्त गाणगापूरला (ganagapur) माेठ्या संख्येने महाराष्ट्रातून (maharashtra) भाविक जातात. बेळगावात कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील बसेस वर मंगळवारी हल्ला केला. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटताना पाहायला मिळाले.

मात्र, याचा कुठलाच परिणाम सोलापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस वाहतूकीवर झालेला नाहीये. आज दत्त जयंतीनिमित्त खास चाळीस ज्यादा बसेस कर्नाटकातील गाणगापूरला सोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सोलापुरातून विजयपूर आणि कलबुर्गी या जिल्ह्यात रोज साठ बसेस (bus) येजा करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT