Buldhana ST Bus Truck Accident Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: एसटी-बस ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात एकाचा मृत्यू, १५ प्रवासी जखमी

ST Bus-Truck Accident: चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana ST Bus-Truck Accident News

बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस (Bus Accident) पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून २० ते २२ प्रवासी प्रवास करीत होते.

शुक्रवारी पहाटे बस चिखली-देऊळगावराजा मार्गावरील रामनगर फाट्याजवळ आली असता, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात मालवाहू ट्रक आला. (Latest Marathi News)

काही क्षणातच मालवाहू ट्रकने बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेला प्रवासी खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदौर महामार्गावर आज पुन्हा ट्राफिक जाम

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

Jalna Crime : मुलीच्या छेडखानीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT