MSRTC Big Decision Saam Tv
महाराष्ट्र

MSRTC Big Decision: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; ३० रुपयांत चहा-नाश्ता अन्..., वाचा नेमके काय घेतला निर्णय?

MSRTC Big Decision of ST Mahamandal: महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना बस स्थानकावरील स्वच्छतागृहे मोफत वापरता येणार आहेत.

Siddhi Hande

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

एसटीच्या ताफ्यात ८००० नवीन बस दाखल होणार

बस स्थानकावरील स्वच्छतागृह मोफत वापरता येणार

राज्यातील एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने आज निर्णय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एसटी ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची भर टाकण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या सेवा वाढणार आहेत. याचसोबत एसटी स्थानकावरही प्रवाशांना मोफत स्वच्छतागृह वापरता येणार आहे.

एसटीबाबत मोठा निर्णय (Maharashtra Government Big Decision on ST Mahamandal)

एसटी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्यभरातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह आता १ जूनपासून पूर्णपणे मोफत वापरासाठी उपलब्ध असणार आहेत. तसंच, एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८ हजार नव्या बसची भर घालण्यात येणार असून, या बस टप्प्या टप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात पाठवल्या जाणार आहेत...

कॅन्टीमध्ये माफक रुपयात नाश्ता (MSRTC ST Mahamandal Big Decision)

बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांना ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जर कुठेही हा नियम पाळला गेला नाही, तर संबंधित कॅन्टीनवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीनची पाहणी करताना स्वच्छता आढळली. मात्र दरफलकांवर चिकटपट्टी लावून दर लपवण्याचा प्रकार समोर आला.ही बाब निदर्शनास येताच मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. यानंतर कॅन्टीनच्या नाश्त्याच्या किंमतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. जेणेकरुन प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार नाही.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. या दरम्यान त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसराला अचानक भेट देत बस स्थानकातील कॅन्टीन सोबतच स्वच्छतागृहाचे पाहणी केली. स्वच्छतागृहात भेट देताच त्यांची स्वच्छता पाहून मी आज आलोय म्हणून इतकी स्वच्छता केली आहे का ? असं म्हणत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली... स्वच्छता गृहामध्ये जादा पैसे आकारण्याच्या तक्रारीबाबत प्रताप सरनाईक यांनी संबंधित कंत्राटदाराला जाब देखील विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT