अकोला: महावितरणचा 'तो' मद्यधुंद सहायक अभियंता अखेर निलंबित Saam TV
महाराष्ट्र

अकोला: महावितरणचा 'तो' मद्यधुंद सहायक अभियंता अखेर निलंबित

अकोट दक्षिण झोनचे सहाय्यक अभियंता हे दारू पिऊन गावात वीजबिल वसुलीसाठी येत असल्याचा आरोप पाथर्डी येथील ग्रामस्थांनी केला आहे.

जयेश गावंडे

अकोला: अकोट दक्षिण झोनचे सहाय्यक अभियंता हे दारू पिऊन गावात वीजबिल वसुलीसाठी येत असल्याचा आरोप पाथर्डी येथील ग्रामस्थांनी केला आहे. सहाय्यक अभियंत्यास दारू पिऊन आल्यावर ग्रामस्थांनी त्यांचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला आहे. तसेच त्या अभियंत्यांची तक्रार पालकमंत्री आणि महावितरणचे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. ही घटना 18 सप्टेंबर रोजीची आहे. याची बातमी साम टिव्हीने सुध्दा दाखवली होती. दरम्यान, सबंधित सहाय्यक अभियंता सरकटे यास निलंबित केले असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी आज दिली. अकोट दक्षिण वीज वितरण केंद्र अंतर्गत पाथर्डी या गावात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी हे वीज बिल वसुलीसाठी गावात सकाळपासून आले. त्यामध्ये सहायक अभियंता श्री. सरकटे हे दुपारी पाथर्डी येथे दारू पिऊन आले. ग्राहकांसोबत वाद घातला. त्यामुळे इतर कर्मचारी यांनी वसुली सोडून पाथर्डी गावातून पळ काढला.

मात्र, सरकटे हे कर्तव्यावर असतांना गावात दारु पिऊन आले. त्यांनी ग्रामस्थांशी अरेरावी केली. त्यामुळे ग्रामस्थ एकत्र झाले. ग्रामस्थांनी त्यांना पकडून त्यांना जाब विचारला. सरकटे हे ग्रामस्थांना म्हणत होते, ' काही विषय नाही, तुमचे ही काम करून टाकू'. मात्र, ग्रामस्थ त्यांना जाब विचारत होते. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी त्यांचा व्हिडीओ काढला. तो व्हायरल केला. तसेच पालकमंत्री बच्चू कडू, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

सहायक अभियंता सरकटे यांच्याबद्दल तक्रार दाखल झाली होती. तसेच त्यांच्याबद्दल आधीच्या ही तक्रारी होत्या. वीज बिल वसुली बाकी होती. कर्तव्यात कसूर होता. त्यामुळे त्यांना रविवारी, 19 सप्टेंबर रोजीच निलंबित केले असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

Maharashtra Live News Update: नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाने काढला मुक मोर्चा

Satara Tourism: आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव हवा असेल तर साताऱ्यातील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

Girls Fighting : एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, जमिनीवर पाडून धूधू धुतलं; कॉलेजबाहेर तरुणींचा तुफान राडा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT