DC vs SRH: आजचा सामना हैद्राबादसाठी 'करो या मरो'; दिल्लीचा दिग्गज संघात

श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पुनरागमनाने बळकट झालेला दिल्ली कॅपिटल्स संघ बुधवारी (22 सप्टेंबर) दुबईत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (DC vs SRH) आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
DC vs SRH: आजचा सामना हैद्राबादसाठी 'करो या मरो'; दिल्लीचा दिग्गज संघात
DC vs SRH: आजचा सामना हैद्राबादसाठी 'करो या मरो'; दिल्लीचा दिग्गज संघातTwitter/ @IPL
Published On

IPL 2021: श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पुनरागमनाने बळकट झालेला दिल्ली कॅपिटल्स संघ बुधवारी (22 सप्टेंबर) दुबईत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (DC vs SRH) आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा दिल्लीचा संघ आता नव्याने सुरुवात करणार आहे. दिल्ली सध्या 8 सामन्यांत 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्सचे 7 सामन्यांत केवळ 2 गुण आहेत आणि ते पाँईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहेत. सनरायझर्सने आतापर्यंत फक्त एक सामना जिंकला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या लेगला विजयासह संपवले होते. दिल्लीचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करु शकतो. सलामीवीर शिखर धवन पर्पल कॅपचा प्रबळ दावेदार आहे. निवड समितीने धवनला टी -20 विश्वचषक संघात स्थान दिले नाही. तो युवा पृथ्वी शॉसह डावाची सुरुवात करेल. श्रेयस अय्यर दुखापतीतून सावल्यामुळे दिल्लीच्या मधल्या फळीला बळकटी मिळाली आहे, ज्यात ऋषभ पंत, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टोइनिस आणि वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर यांचाही समावेश आहे.

DC vs SRH: आजचा सामना हैद्राबादसाठी 'करो या मरो'; दिल्लीचा दिग्गज संघात
NCRB: भाजपशासित राज्य महिला अत्याचारांमध्ये अव्वल; काँग्रेस आक्रमक

दिल्लीचे गोलंदाजी आक्रमणही मजबूत आहे, पहिल्या टप्प्यात आवेश खान (14 विकेट) आणि कगिसो रबाडा यांनी चमकदार गोलंदाजी केली होती. रबाडा पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये प्रभावीपणे गोलंदाजी करु शकतो. याशिवाय अनुभवी रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, अक्षर पटेल, ललित यादव यांसारखे फिरकीपटू दिल्ली संघात आहेत.

दुसरीकडे सनरायझर्स हैद्रबादचा प्रश्न आहे, एक विजय त्यांचे मनोबल वाढवेल आणि त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यास मदत करेल. तथापि, त्यांना जॉनी बेअरस्टोची उणीव भासेल, ज्याने दुसऱ्या लेगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. संघाला केन विल्यमसन, मनीष पांडे, रिद्धीमान साहा, केदार जाधव, अब्दुल समद आणि विजय शंकर यांच्या चांगल्या योगदानाची गरज आहे. गोलंदाजीचे नेतृत्व रशीद खान करेल, ज्याला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स

ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरोम हेटमायर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, एन्रीक नॉर्टजे, अवेश खान, बेन द्वारशुईस, इशांत शर्मा, कगिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया , लुकमन मेरीवाला, प्रवीण दुबे, टॉम कुरान, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्स आणि विष्णू विनोद.

सनरायझर्स हैदराबाद

केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, शेरफेन रदरफोर्ड, रिद्धीमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, रशीद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, बेसिल थम्पी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जे सुचित, जेसन होल्डर, विराट सिंग, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान, जेसन रॉय.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com