NCRB: भाजपशासित राज्य महिला अत्याचारांमध्ये अव्वल; काँग्रेस आक्रमक

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, गेल्या वर्षी 2020 मध्ये भारतात दररोज सरासरी 80 लोकांची हत्या झाली.
NCRB: भाजपशासित राज्य महिला अत्याचारांमध्ये अव्वल; काँग्रेस आक्रमक
NCRB: भाजपशासित राज्य महिला अत्याचारांमध्ये अव्वल; काँग्रेस आक्रमकSaam TV

नवी दिल्ली: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, गेल्या वर्षी 2020 मध्ये भारतात दररोज सरासरी 80 लोकांची हत्या झाली. या प्रकरणात, जर आपण राज्यांची आकडेवारी पाहिली तर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) अव्वल स्थानावर राहिला, जिथे हत्येच्या प्रकरणांमध्ये वर्ष 2019 च्या तुलनेत वर्ष 2020 मध्ये एक टक्का वाढ नोंदवण्यात आली आहे. एनसीआरबीने बुधवारी 2020 च्या गुन्ह्यांचा अहवाल जाहीर केला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, भारतात वर्ष 2020 मध्ये एकूण 29,193 लोकांचा खून झाल्याने मृत्यू झाला. यानुसार, देशात दररोज सरासरी 80 खुनांची नोंद होते. राज्यांच्या चार्टमध्ये उत्तर प्रदेश अव्वल आहे. 2019 च्या तुलनेत एक टक्का वाढ झाली. हा अहवाल आल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

NCRB: भाजपशासित राज्य महिला अत्याचारांमध्ये अव्वल; काँग्रेस आक्रमक
OBC आरक्षणासाठी राज्य सरकार सुधारित अध्यादेश काढण्याची शक्यता

या अहावालावर काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विट करत टीका केली आहे. आत्ताच घोषित झालेल्या NCRB 2020 नुसार महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश पुन्हा आघाडीवर आहे. भाजपाशासित आसाम, मध्यप्रदेश, हरयाणा, कर्नाटकातही यात मोठे प्रमाण आहे. आसाममध्ये सर्वाधिक प्रति लक्ष 154 महिला अत्याचार झाले. गँगरेप मर्डर घटनांमध्ये ही उत्तरप्रदेश पुढे आहे असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

आकडेवारीनुसार, जर आपण राज्यांकडे नजर टाकली तर वर्ष 2020 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक 3,779 खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर बिहारमध्ये 3150, महाराष्ट्रात 2163, मध्य प्रदेशात 2101 आणि पश्चिम बंगालमध्ये 1,948 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तथापि, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये भारतात अपहरणाच्या घटनांमध्ये 19 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या NCRB च्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये अपहरणाची 1,05,036 प्रकरणे नोंदवली गेली. ज्याच्या विरोधात 2020 मध्ये एकूण 84,805 अपहरणाचे गुन्हे दाखल झाले.

राष्ट्रीय राजधानीसह देशात कोविड -19 च्या साथीमुळे लॉकडाऊन कालावधीत गुन्हे कमी झाले आहेत. आकड्यांनुसार, वर्ष 2020 मध्ये दिल्लीमध्ये 422 खुनाचे गुन्हे दाखल झाले. एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, देशातील एकूण हत्या झालेल्यांपैकी जास्तीत जास्त 38.5 टक्के 30-45 वयोगटातील आहेत. तर 35.9 टक्के 18-30 वर्षे वयोगटातील होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com