Smart Meter Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Smart Meter Maharashtra: महावितरणचा सुलतानी फर्मान! स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम, ग्राहकांमध्ये संताप

Mahavitaran 48 hour smart meter notice explained: महावितरणनं स्मार्ट मीटर लावण्यासाठी ग्राहकांना अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक संतप्त झाला आहे.

Priya More
  • महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 48 तासांची नोटीस दिली

  • राज्यभर ग्राहकांनी स्मार्ट मीटरविरोधात आक्रमक भूमिका घेतली

  • अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध प्रदर्शन झाले

  • जास्त बिल आणि सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद

महावितरणनं स्मार्ट मीटर लावण्यासाठी ग्राहकांना अल्टिमेटम दिला. मात्र याचं स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. स्मार्ट मीटर न लावल्यास नेमकं काय होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...

राज्यात सध्या 'स्मार्ट मीटर'चा मुद्दा चांगलाच तापलाय. सध्याचं वीज मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर लावण्याकरिता महावितरणकडून येत असलेल्या मेसेजमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. महावितरणच्या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलयं. पाहूयात...

प्रिय उपभोक्ता

भारत सरकारनं दि. 17.08.2021 रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर स्मार्ट मीटर नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून 48 तासांनंतर महावितरण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे. हा संदेश तुमचे सध्याचे मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना आहे.

दरम्यान राज्यात ठिकठिकाणी स्मार्ट मीटरविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केलाय."आमच्याकडे आधीच सोलर मीटर असताना पुन्हा हे नवीन स्मार्ट मीटर कशासाठी लादले जातय?" असा सवाल लातूरमधील ग्राहकांनी उपस्थित केलाय. हिंगोलीतही स्मार्ट मीटरच्या नावाखाली जास्त पैसे आकरल्याचा गंभीर आरोप ग्राहकांनी केलाय.

तर कल्याणमध्ये स्मार्ट मीटरमुळे महावितरणच्या 'तेजश्री' कार्यालयात जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ठाकरसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात काळे झेंडे घेऊन स्मार्ट मीटरविरोधात महावितरणचा निषेध केला. स्मार्ट मीटरच्या नावाखाली बदलापुरातल्या जनतेला भरमसाठ बिलं पाठवण्यात येत असल्यानं बदलापुरातही आंदोलन करण्यात आलं.

वरिष्ठांच्या आदेशानुसार हा मेसेज ग्राहकांना पाठवल्याचं महावितरणचं म्हणणंय. तसंच स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचा फायदा होणार असल्याचा दावाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलाय. मात्र स्मार्ट मीटरसाठी ग्राहकांना अल्टिमेटम दिला जात असल्यानं विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. अदानी-अंबानींचे खिसे भरण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरू नका, असा थेट इशारा काँग्रेसनं दिलाय.

मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत ग्राहकांना प्रीपेड मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र आता पोस्टपेड स्मार्ट मीटरही नको, अशी भूमिका ग्राहकांनी घेतलीय. मात्र 48 तासांत ग्राहकांनी मीटर न बदलू दिल्यास नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे स्मार्ट मीटरवरून राज्यात मोठा वाद निर्माण होणार असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धानोरकर-वडेट्टीवारांमध्ये पुन्हा संघर्ष; सत्ता गमावल्यानंतरही काँग्रेसमधील वाद मिटेना

नवी मुंबईत भाजपमधील वाद टोकाला; नाईक-म्हात्रे वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

Mumbai Water Crisis: मुंबईत पाणीबाणी! BMC कडून नियमावली जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई

Maharashtra News Live Update: कृष्णा नदीचे पाणी दूषित; पिण्यासाठी वापरू नये, प्रशासनाच्या सूचना

Broiler Chickens Death : ३६०० कोंबड्यांचा गूढ मृत्यू; पोल्ट्री व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान, एका रात्रीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT