Succcess Story Saam Tv
महाराष्ट्र

Succcess Story: जिद्द! पहिल्याच प्रयत्नात सरकारी नोकरी, सोलापूरमधील शेतकऱ्याची लेक झाली क्लास वन अधिकारी, वाचा प्रेरणादायी प्रवास

MPSC Success Story Surekha Kamble: सुरेखा कांबळे यांनी एमपीएससी परीक्षा पास केली आहे. त्या राज्यात मुलींमध्ये पहिल्या आल्या आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

सुरेखा कांबळे एमपीएससीत मुलींमध्ये प्रथम

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली एमपीएससी

हालाखीच्या परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर मिळवलं यश

मेहनत आणि सातत्य असल्यावर तुम्हाला यश हे मिळतेच. प्रत्येकजण आपल्या मेहनतीच्या जोरावर काहीही करु शकते. दरम्यान, असं यश मोहोळ तालुक्यातील सुरेखा सौदागर कांबळे यांनी मिळवलं आहे. त्यांनी एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये प्रथम येऊन एक नवीन विक्रम केला आहे. एमपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेत पास होणेदेखील खूप कठीण असते परंतु सुरेखा यांनी हे यश मिळवलं आहे.

गरीब कुटुंबात लहानाची मोठी झाली

सुरेखा यांचे बालपण खूप गरीब कुटुंबात गेले. सुरेखा यांचे वडील सौदागर शंकर कांबळे हे जनावरांच्या बाजारात बैलांची शिंगे तासून द्यायचे काम करायचे. त्यांनी परिस्थिती खूप हालाखीची होती. परंतु त्यांनी कधीही याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होऊ दिला नाही. याचेच फळ त्यांना मिळाले. त्यांच्या दोन मुली या प्रशासकीय सेवेत काम करत आहेत.

सुरेखा या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले. सातवीनंतरचे शिक्षण त्यांनी गावातील माध्यमिक शाळेत घेतले. यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालयात बी.एस्सी अॅग्री पदवी प्राप्त केली.

सुरेखा यांनी पहिल्यांदा २०२० मध्ये एमपीएससी (MPSC) परीक्षा दिली.याचवेळी त्या मुलींमध्ये पहिल्या आल्या. त्यांच्या आयुष्याचा तोच टर्निंग पॉइंट ठरला. यावेळी त्यांनी २०२१ मध्ये दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यानंतर त्यांची क्लास १ पदावर निवड झाली. आईवडिलांनी घेतलेल्या मेहनीतचे त्यांनी खऱ्या अर्थाने चीज केले असं म्हणायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

Bigg Boss Marathi 6 Winner: 'तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून...'; 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी कोलते झाली भावूक

Belly Fat: सकाळी या 5 सवयी करा फॉलो, पोटाचा घेर होईल आठवड्यातच कमी

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १० दिवस, लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा सविस्तर

Bhendwal Bhavishyvani 2026: यंदा देशात मुसळधार पाऊस, महापूर येणार; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT