Mpsc State Services 2025 Interview Postponed; New Date Update saam tv
महाराष्ट्र

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

MPSC Rajyaseva Interview Latest News : एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या २१ ते २४ तसेच २६ आणि २८ सप्टेंबरच्या नियोजित मुलाखती पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार मुलाखती २१ ते २४ सप्टेंबर तसेच २६ आणि २८ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित होत्या.

Akshay Badve

  • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या मुलाखती पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

  • MPSC ने मुलाखती पुढे ढकलण्यामागे प्रशासकीय कारणे दिली आहेत.

  • प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा प्रक्रियेबाबत चिंता कायम आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा २०२५ च्या मुलाखती पुढे ढकलण्यात आलाय. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर नव्याने सेट करण्याच्या मागणीबाबत आयोगाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्यामुळे मुख्य परीक्षा पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, ही विद्यार्थ्यांची मागणी कायम आहे. (Mpsc Has Postponed State Services Main Examination 2025 Interview Schedule)

प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर फेरतपासणी होईपर्यंत आयोगाला सांगून मुलाखती थांबविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. मात्र आयोगाकडून अधिकृत परिपत्रक न आल्याने २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान नियोजित असलेल्या मुलाखतींबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी द्विधा मनःस्थिती होती.'मुलाखतीची तयारी करायची की मुख्य परीक्षेचा अभ्यास?' असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत अद्याप अस्पष्टता

राज्यसेवा २०२५च्या मुलाखतींचा प्रश्न सुटला असला तरी, ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान नियोजित असलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत अद्याप अस्पष्टता आहे. परीक्षेचे पेपर साधारण दोन महिने आधीच सेट केले जातात. आयोगाचे निलंबित अप्पर सचिव अभिजित लेंडवे याच्या वादग्रस्त कार्यकाळातच आगामी मुख्य परीक्षेचे पेपर तयार झाले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेतही गैरप्रकार झाला नसेल कशावरून? त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

SCROLL FOR NEXT