MPSC PSI Exam Saam Tv
महाराष्ट्र

MPSC PSI Exam : पोलीस उपनिरीक्षक विभागीय परीक्षेत बदल, आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर

MPSC PSI Exam Timetable : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार होती. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ शनिवार दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्याचे नियोजित होते.

कोमल दामुद्रे

MPSC PSI Exam Date Change :

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदांची परीक्षा लवकरच घेण्यात येणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ शनिवार दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्याचे नियोजित होते.

परंतु, प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सुधारित दिनांकास म्हणजेच रविवारी दिनांक १० डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात येईल. याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपसचिवांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगावर खाकी असावी यासाठी लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची (Exam) तयारी करत असतात. आपणही पोलिस (police) होऊन तो मान मिळवावा असे अनेकांना वाचते. महाराष्ट्रात तर पीएसआय पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते. परंतु, या परीक्षेत बदल झाल्यामुळे अनेक उमेदवारांना अभ्यासासाठी अधिक वेळ (Time) मिळणार आहे.

जर तुम्ही देखील ही स्पर्धा पूर्व परीक्षा देत असाल तर या सूचना लक्षात ठेवा

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

  • परीक्षा सुरु होण्यापूर्वी दीड तासआधी केंद्रावर हजर राहाणे अनिवार्य आहे.

  • तसेच स्वत:चे ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र

  • परीक्षा कक्षात मोबाईल अथवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही.

  • परीक्षा कक्षेत कोणतेही गैरवर्तन करण्याचा प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Shift Health : दिवसा झोप, रात्री काम? मग ‘ही’ लक्षणं तुमचं आरोग्य बिघडवू शकतात

Air India Plane Crash: एअर इंडियाचे संतापजनक कृत्य! ब्रिटनमध्ये मृतदेहांची अदलाबदली, कुटुंबीय संतप्त

India US Trade: भारत-अमेरिका ट्रेड दरम्यान चर्चेत आलेले नॉन व्हेज दूध म्हणजे काय? ते कसे ओळखायचे?

Bhiwandi News: टेम्पो अडवल्याने चालकाची सटकली, भररस्त्यात वाहतूक पोलिसाला शिवीगाळ अन् बेदम मारहाण; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT