mpsc, mpsc news, maharashtra, mpsc vacanies m tv
महाराष्ट्र

आठशे पदांची हाेणार भरती; जाणून घ्या एमपीएससी पूर्व परीक्षा रचनेत झालेला महत्‍वपूर्ण बदल

यापुर्वी एमपीसीची यंदा 26 फेब्रुवारीला परीक्षा झाली हाेती. त्याचा निकाल नुकताच एक जूनला जाहीर करण्यात आला होता.

साम न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) आज (गुरुवार) त्यांच्या संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध करुन आठशे पदांच्या भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही भरती महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील (mpsc vacancies) असेल. त्याची (mpsc) पूर्व परीक्षा याच वर्षी आठ ऑक्टोबरला हाेईल. (mpsc declared recruitment for 800 various vacancies)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्‍यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत बदल केला आहे. त्‍यानुसार आता CSAT चा पेपर हा पात्रतेसाठी ग्राह्य पकडण्यात येईल. यामध्ये ३३ टक्‍के गुण मिळविणा-यास पेपर क्रमांक एकमधील गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मेन परीक्षेसाठी गुणवत्ता यादीत स्थान मिळेल.

पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा (student) पेपर क्रमांक दोनची तपासणी झाल्यानंतर ज्‍यांना किमान ३३ टक्‍के गुण (६६ किंवा त्‍यापेक्षा अधिक) मिळतील अशांचा पेपर क्रमांक एक तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्‍या गुणांच्‍या आधारे मुख्य परीक्षेसाठीची गुणवत्ता यादी तयार हाेईल. त्याचा फायदा आर्टस, काॅमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना हाेईल असे तज्ञांचे म्हणणे आहे. आजपर्यंत सिसॅटच्‍या गुणांमुळे सायन्स शाखा, डिप्लाेमाच्या विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ हाेत असे. आता सर्वांना समान संधी उपलब्‍ध होऊ शकतील.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT