MPSC CANCELS TYPING TEST FOR GROUP-C POSTS | BIG RELIEF FOR CANDIDATES Saam Tv
महाराष्ट्र

MPSC Exam : MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गट-क टंकलेखक पदभरतीत मोठा बदल; नवीन नियम लगेच लागू

MPSC Exam 2026 Update News : एमपीएससीने गट-क सेवा परीक्षेसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता अंतिम निवड मुख्य परीक्षेच्या गुणांवर होणार असून, हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

Alisha Khedekar

  • एमपीएससीने टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्णपणे रद्द केली

  • निवड प्रक्रिया आता फक्त मुख्य परीक्षेवर आधारित

  • उमेदवारांचा ताण कमी होणार आणि प्रक्रिया जलद होणार

  • शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र मात्र अनिवार्य राहणार

सागर आव्हाड, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गट-क सेवा परीक्षेअंतर्गत येणाऱ्या ‘लिपिक टंकलेखक’ आणि ‘कर सहाय्यक’ या पदांसाठी घेतली जाणारी स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, २० मे २०२६ रोजी त्याबाबत अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे परीक्षेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असतानाही आयोगाकडून स्वतंत्र कौशल्य चाचणी घेतली जात होती. त्यामुळे निकाल प्रक्रियेला उशीर होत होता आणि उमेदवारांवर अतिरिक्त ताण येत होता. ही बाब लक्षात घेऊन आयोगाने ही स्वतंत्र चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमानुसार, उमेदवारांना आता फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. मुख्य परीक्षेनंतर कोणतीही अतिरिक्त टंकलेखन चाचणी घेतली जाणार नाही. मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारेच अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी जाहीर केली जाईल. यामुळे निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

तसेच, उमेदवारांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी आता थेट शासन स्तरावर, नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. मात्र, अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. दरम्यान, आयोगाचा हा निर्णय गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ साठीही लागू करण्यात आला आहे. या परीक्षेची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून, मुख्य परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ आहे. या निर्णयामुळे हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT