MPSC Drug Inspector exam row intensifies as students allege paper leak and WhatsApp circulation of questions before the test. saam tv
महाराष्ट्र

NEETनंतर MPSCचाही पेपर फुटला? औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीचं सत्य काय?

Mpsc Exam Paper Leak Drug Inspector Allegations Maharashtra: नीट, TETनंतर आता MPSCचाही पेपर फुटल्याचा गंभीर आरोप काही विद्यार्थ्यांनी केलाय...मात्र MPSCचा नेमका कोणता पेपर आणि तो कसा फुटला? खरचं या दाव्यात काही तथ्य आहे का? MPSCनं यासंदर्भात काय स्पष्टीकरण दिलयं...पाहूयात या रिपोर्टमधून....

Suprim Maskar

नीट, TET पेपरफुटीनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय.... MPSC मार्फत 22 मार्चला औषध निरीक्षक पदासाठी परिक्षा घेण्यात आली... मात्र या परिक्षेच्या दोन दिवसआधी 20 मार्चलाच व्हॉट्सअॅपवर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थी ऋषिकेश गांगुर्डे या विद्यार्थ्यानं केलाय.

मुळात या प्रकरणी गौरव पाटील या परीक्षार्थीनं 22 मार्चचा पेपर फुटल्याची तक्रार मेल द्वारे MPSCला 24 जुलेला केली होती. या तक्रारीत विद्यार्थ्यानं नेमके काय आरोप केले आहेत ते पाहूयात...

मैत्रिणीनं 20 मार्चला औषध निरीक्षक परिक्षेत येणाऱ्या प्रश्नांचे 25 फोटो व्हॉट्सअॅपवर आल्याचे सांगितले

25 फोटोत परीक्षेतील जवळपास 200 प्रश्न पर्यायासह होते

MPSCच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न सारखे होते

कौटील्य फाऊंडेशनचे संचालक प्रवीण पाटील यांनी पेपरसाठी 5 लाख रुपयांची मागणी विद्यार्थ्यांकडे केली

पेपर दिल्यानंतर त्यातील 10 प्रश्न चुकीचे सोडवण्यास सांगितले होते..

ठाकरेसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी या पेपरफुटीवरून कौटील्य फाऊंडेशनच्या प्रवीण पाटलांवर आरोप केले आहेत. त्यामुळे क्लास चालकांवर कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित केलाय... तर प्रवीण पाटलांनी पेपरफुटीचे आरोप फेटाळून लावलेत... मात्र अचानक या प्रकरणात मोठा ट्विट्स आला. ज्या गौरव पाटीलनं पेपरफुटीची तक्रार केली होती त्यानंत नंतर पुन्हा परीक्षा देता म्हणून बनाव केल्याचा सांगत MPSCला मेल पाठवून आपली तक्रार मागे घेतली. मात्र त्याच्यावर दबाव टाकून तक्रार मागे घ्यायला लावल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. तर या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचं स्पष्टीकरण MPSCनं दिलंय.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं... त्यात आता MPSCतही पेपरफुटी झाल्याचा दावा करण्यात येतोय. MPSCनं यावर स्पष्टीकऱण दिलं असलं तरी एखाद्या क्लासेसच्या प्रश्नसंचातल्या प्रश्नांचं MPSC प्रश्नपत्रिकेशी मोठ्या प्रमाणावर साम्य असेल तर त्याचीही चौकशी व्हायला हवी. कारण नीट प्रकरणात अशाच खासगी क्लासेसचं कनेक्शन समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची सखोल तपास करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT