Vinayak Raut News, cm eknath shinde, ratnagiri, devendra fadnavis, akola, shevgaon saam tv
महाराष्ट्र

Vinayak Raut News : 'हे सगळं राजकीय पोळी भाजण्यासाठी'; खासदार विनायक राऊतांचा भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आराेप

रत्नागिरी जिल्ह्यात खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अमोल कलये

Vinayak Raut News : अकोला (akola), शेवगावात (shevgaon) जातीय तेढ निर्माण करायला भाजपची (bjp) साथ मिळत आहे असा गंभीर आराेप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी केला आहे. जातीय तेढ निर्माण करू भाजप आणि शिंदे (cm eknath shinde) राजकीय पोळी भाजून घेताहेत असेही खासदार राऊत यांनी नमूद केले. (Maharashtra News)

अकोला आणि शेवगावात रविवारी दाेन गटात वाद झाले. त्यावर माध्यमांशी बाेलताना खासदार विनायक राऊत यांनी या वादासाठी भाजपकडून खत पाणी घातले जात आहे अशी शंका उपस्थित केली गेली. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आवाहन करताना राऊत म्हणाले कुणी आपल्यात मिठाचा खडा टाकत असेल तर आपण सावध राहिले पाहिजे.

कर्नाटकमध्ये जनता कि बात कळली. आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपला शेवटच्या स्तरापर्यंत उतरावे लागते, हे भाजपचे दुर्दैव असल्याचे खासदार राऊतांनी नमूद केले. ते म्हणाले पक्ष सावरण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्लीत फिरत आहेत. मुंबई मनपासह सर्व महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लगेच घ्या. जनता तुम्हाला जागा दाखवेल असा विश्वास देखील खासादर विनायक राऊत यांनी कर्नाटकच्या निकालावर बाेलताना व्यक्त केला.

दरम्यान ईडीच्या नाेटीसबाबत बाेलताताना राऊत म्हणाले जयंत पाटील (jayant patil ed notice) हा सज्जन माणूस आहे. खरंतर जयंत पाटलांना त्रास दिला जात आहे असे सांगताना राऊत यांनी समीर वानखेडेच्या (sameer wankhede) माध्यमातून भाजप खंडणी कशी उकळत होते हे वारंवार सांगितले गेले. भाजपचा एक नेता समीर वानखेडेच्या माध्यमातून खंडणी उकळून त्याला पाठीशी घालत होता असा आराेप राऊत यांनी केला.

नितेश राणे (nitesh rane) यांना भाजपने भुकण्यासाठी ठेवले आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर केलेल्या टिकेवर विनायक राऊत यांनी प्रत्युउत्तर दिले. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्याबाबतीत रविवारी नपुसंकचं विधान केले.

त्याला भाजपने वेळीच आवार घालावे. भाजपने याला आवर न घातल्यास भाजपचे अधपतन होईल असेही राऊत यांनी म्हटलं. दरम्यान नारायण राणे (narayan rane) यांच्या काळात खून झाले त्याची देखील देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT