CID ची माेठी कारवाई; एकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिस निरीक्षकाला अटक

या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
beed, CID, Parli, Umakant Kasture
beed, CID, Parli, Umakant Kasturesaam tv

Beed News : पोलीस कोठडीत असताना एका संशयित आराेपीच्या मृत्यू प्रकरणी सीआयडीने बीड येथील परळीमध्ये पोलीस निरीक्षकाला अटक केली. उमाकांत कस्तुरे (police inspector Umakant Kasture) असं अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. कस्तुरे यास अंबाजोगाई न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Maharashtra News)

beed, CID, Parli, Umakant Kasture
CM Eknath Shinde यांच्या खासदाराने थाेपटले दंड, "बाप तो बाप रहेगा" गाण्यावरील नृत्य Social Media त Viral (पाहा व्हिडिओ)

बीड परळी पोलीस ठाण्यात 2014 मध्ये कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका संशयित आरोपीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत संबंधिताचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.

beed, CID, Parli, Umakant Kasture
Bike वरुन आले अन् नवरदेवावर हल्ला चढविला, ISRO चे वरिष्ठ शास्त्रज्ञ गंभीर जखमी

त्यानंतर या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्यावर सीआयडी मार्फत गुन्हा दाखल झाला. आता सीआयडीने कस्तुरे यांना अटक केली. दरम्यान या अटकेनंतर बीड पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com