Udayanraje Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

दिलदार उदयनराजे भोसले! 'त्या' मुलीकडून सगळी पुस्तके घेतली विकत

उदयनराजे भोसले भावनिक झाल्याचे दिसत आहेत.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

सातारा: खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांचा कडक स्वभावामुळे सगळ्यांना माहित आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. पण आज सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत (Video) ते भावनिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

भाजप (BJP) खासदार उदयनराजे भोसले एका पेट्रोल पंपाजवळ पुस्तक विकणाऱ्या मुलीची सर्व पुस्तके खरेदी करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याने जात असताना त्यांनी एका लहान मुलीला पुस्तक विकताना पाहिले. त्यानंतर त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. यानंतर त्या मुलीला जवळ बोलवले, आणि मुलीजवळ असणारी सर्व पुस्तके विकत घेतली. या पुस्तकांचे त्यांनी अनाथाश्रमातील मुलांना वाटप केले.

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. उदयनराजे भोसले या व्हिडिओत भावनिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या मुलीकडील सर्व पुस्तके, कॅलेंडर विकत घेत तिला पैसे दिले. आणि हे सर्व जवळच असणाऱ्या अनाथ आश्रमात वाटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांकडे निघाले

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला, कुठं लपवला होता?

Cabbage Cutlet Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत कोबीचे कटलेट, संध्याकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

Pune Tourism : कॅम्पिंग, ट्रेकिंगसाठी पुण्यातील ऐतिहासिक ठिकाण, येथून दिसतो निसर्गाचा अद्भुत नजारा

Jalna Politics: जालन्यात काँग्रेसकडून अजित पवारांना झटका, जवळच्या नेत्याने सोडली साथ

SCROLL FOR NEXT