UPSC मध्ये महाराष्ट्राने मारली बाजी; रँकमध्ये कोण?

आज यूपीएससी चा निकाल लागला. श्रुती शर्मा देशात अव्वल आली.
UPSC Result
UPSC Result Saam Tv
Published On

नागपूर,लातूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आला. यामध्ये उपराजधानी नागपूर येथील तिघांनी बाजी मारली असून उपराजधानीच्या निकालाचा टक्काही वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यापैकी सुमित रामटेके याने ३५८ वा रॅंक मिळविला आहे. तर लातूरमधील औसा येथील शुभम संजय भोसले यानेही यश मिळवले आहे. हा विद्यार्थी देशात १४९ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे.

UPSC Result
UPSC 2021 Result: यूपीएससीत मुलींची बाजी, श्रुती शर्मा देशात अव्वल

गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ यादरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यात नागपूरमधील सहा उमेदवारांचा समावेश होता. दरम्यान युपीएससी सीएसई- २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार निकालाची घोषणा झाली. त्यात सहापैकी तीन उमेदवारांनी बाजी मारली आहे. सुमितने यापूर्वीही युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून तो सध्या केद्रातील माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहे. आता या रॅंकने त्याचा आयएएस होण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

UPSC Result
PM मोदींची मोठी घोषणा! कोविड'मध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी 'पीएम केअर फॉर चिल्ड्रन' योजना

लातूर जिल्ह्यातील शुभम भोसलेचेही यश

औसा येथील शिक्षक असलेले संजय भोसले यांचा मुलगा शुभम हा (UPSC) परीक्षेत देशात १४९ रँक मिळवली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण औसा येथील श्री मुखतेश्वर विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालय झाले. अभियांत्रिकी शिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले.

महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी

1) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३)

2) ओंकार पवार (१९४)

3) शुभम भोसले (१४९)

4) अक्षय वाखारे (२०३)

5) अमित लक्ष्मण शिंदे (५७०)

6) पूजा खेडकर (६७९)

7) अमोल आवटे (६७८)

8) आदित्य काकडे (१२९)

9) विनय कुमार गाडगे (१५१)

10) अर्जित महाजन (२०४)

11) तन्मय काळे (२३०)

12) अभिजित पाटील (२२६)

13) प्रतिक मंत्री (२५२)

14) वैभव काजळे (३२५)

15) अभिजित पठारे (३३३)

१६) ओमकार शिंदे (४३३)

१७) सागर काळे (२८०)

१८) देवराज पाटील (४६२)

१९) नीरज पाटील (५६०)

२०) आशिष पाटील (५६३)

२१) निखील पाटील (१३९)

२२) स्वप्नील पवार (४१८)

२३) अनिकेत कुलकर्णी (४९२)

२४) राहुल देशमुख (३४९)

२५) रोशन देशमुख (४५१)

२६) रोहन कदम (२९५)

२७ ) अक्षय महाडिक (२१२)

२८) शिल्पा खनीकर (५१२)

२९)रामेश्वर सब्बनवाड (२०२)

३०)शुभम नगराले (५६८)

३१)शुभम भैसारे (९७)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com